बिंधास्त स्टाईलसाठी कुणाला फॉलो करतो टायगर श्रॉफ, वाचून थक्क व्हाल

'हीरोपंती 2' (Heropanthi 2) चा लोकप्रिय अभिनेता आणि युथ आयकॉन बनलेला बॉलीवुड स्टार टायगर श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात वेल ग्रूम्ड अभिनेता मानला जातो. 

Updated: Jun 28, 2022, 07:46 PM IST
बिंधास्त स्टाईलसाठी कुणाला फॉलो करतो टायगर श्रॉफ, वाचून थक्क व्हाल

मुंबई : 'हीरोपंती 2' (Heropanthi 2) चा लोकप्रिय अभिनेता आणि युथ आयकॉन बनलेला बॉलीवुड स्टार टायगर श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात वेल ग्रूम्ड अभिनेता मानला जातो.  टायगरच्या लुक्सचे असंख्य चाहते आहेत. मात्र तुम्हाला कदाचित माहीत नसेल, की या लूक्स आणि फॅशन स्टाईलसाठी टायगर श्रॉफ कुणाला फॉलो करतो.

 फिटनेस, फॅशन आणि एक्शनच्याबाबतीत बॉलीवुडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या टायगर श्रॉफबाबत बोलायचं झालं तर या सगळ्यामागे आहेत त्याचे वडील जॅकी श्रॉफ 

टायगरने नुकतीच केलेली सोशल मीडिया पोस्ट बघितली, तर, यात ही गोष्ट अगदीच स्पष्ट होते. स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग मंच कू वर टायगर श्रॉफने आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये एक व्हिडियो शेयर केलाय. यात तो आपल्या व्हेनिटी व्हॅनमध्ये वडील जॅकी श्रॉफसोबत उभा आहे. दोघांनीही काळ्या रंगाचे जॅकेट्स घातले आहेत. दोघंही कमालीचे स्टायलिश दिसत आहेत.  यासोबतच टायगरने या व्हीडिओसोबत मस्त गाणं जोडलं आहे. ते गाणं आहे, 'डॅडी.... डॅडी कूल... डॅडी... डॅडी कूल...'

याआधी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीतही टायगर श्रॉफने याबाबत भाष्य केलं होतं. फॅशन आणि लूक्सचा प्रश्न येतो तेव्हा तो आपले वडील जॅकी श्रॉफ यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो.  त्याला विचारले गेलं, की फॅशनबाबत बॉलीवूडमध्ये कुणाला फॉलो करतो, तर त्याने वडिलांचं नाव घेतलं. तो म्हणाला, की वडील जे काही घालतात, त्याची नक्कल मी अजिबातच करू शकत नाही. पण मी त्यांची बिंधास स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न नक्की करतो. कारण ते तर काहीही घालून त्यात कम्फर्टेबल दिसू शकतात. 

कसे कपडे आवडतात टायगरला
टायगर तरुणाईत कमालीचा लोकप्रिय आहे. कपड्यांबाबत बोलायचं तर, टायगरला नेहमीच आरामदायक कपडे घालायला आवडतात. 
 
टायगरचा या गोष्टींवर असतो कटाक्ष 
रोज योग्य प्रमाणात पाणी पिणं आणि नीट झोप घेणं हा टायगरच्या दैनंदिनीचा भाग आहे.  यामुळे तो एकदम फ्रेश आणि छान दिसतो. टायगर आपल्या त्वचेची खास निगा राखतो. दिवसातून दोनदा डिटॉक्स करतो. टायगर आपलं स्किन केयर प्रॉडक्ट्स नेहमीच प्रवास आणि शूटिंगच्या काळात सोबत ठेवतो. 

टायगर श्रॉफ लवकरच दिसू शकतो 'वॉर' सीक्वल मध्ये 
टाइगर लवकरच वॉर सीक्वलमध्ये ह्रतिक रोशनसोबत दिसू शकतो. याचा अंदाज टायगरच्या सोशल मीडिया पोस्टवरून घेता येतो. यात टायगरने दोन अर्ध्या चेहऱ्यांचा एक मोनोक्रोमॅटिक कोलाज शेयर केला होता. यात पहिला चेहरा खुद्द टायगरचा आहे आणि दुसरा 'वॉर' मध्ये सहकलाकार असलेल्या ह्रतिक रोशनचा आहे. 

ही पोस्ट शेअर करत, टायगरने एक पोल सुरू केला. यात त्याने चाहत्यांना एक प्रश्न विचारला, "वॉर पार्ट-2 कोई भी?" यासोबत हो किंवा नाही असे दोन पर्याय दिले गेलेत. यावर जवळपास 96 टक्के चाहत्यांनी हो म्हणत आपलं मत नोंदवलं आहे. यातूनच स्पष्ट होतं, की चाहते या अँक्शन सिनेमाचा सीक्वल पाहण्यास किती आतूर आहेत. 

टायगरच्या आगामी सिनेमाबाबत बोलायचं झालं तर टायगर गणपतच्या चित्रीकरणात सध्या बराच गुंतलेला आहे. हा सिनेमा येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टायगरसोबत कृति सेननची  मुख्य भूमिका असणार आहे.