TMKOC: तारक मेहतामधील सोनूची अवस्था पाहून चाहते चिंतेत; फोटो व्हायरल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका अनेक वर्षांपासून सातत्याने लोकांचं मनोरंजन करत आहे.

Updated: Oct 25, 2022, 07:02 PM IST
TMKOC: तारक मेहतामधील सोनूची अवस्था पाहून चाहते चिंतेत; फोटो व्हायरल title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका अनेक वर्षांपासून सातत्याने लोकांचं मनोरंजन करत आहे. या शोमधील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपली छाप पाडली आहे. तारक मेहता या शोमधील अनेक कलाकारांनी निरोप घेतला असला तरी आजही हे स्टार्स या शोमुळे ओळखले जातात.

अशा परिस्थितीत या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे यांच्या मुलीची 'सोनू'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशालीही तिच्या फोटोमुळे चर्चेत आहे. अशा परिस्थितीत तिच्या लेटेस्ट लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

दिवाळीचे फोटो शेअर केले
दिवाळीच्या मुहूर्तावर सोनू उर्फ ​​निधी भानुशालीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये काही लोकांना तिचा बदललेला लूक आवडला तर काहींना तिला पाहून आश्चर्य वाटलं. ताज्या फोटोंमध्ये निधीला ओळखण चाहत्यांसाठी कठीण होत आहे. या फोटोत निधीचे केस खूपच लहान दिसत आहेत. तिच्या फोटोंवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं आहे की, 'पहिली खूप गोंडस होती, आता खूप वेगळी दिसते'.

चाहत्यांना ओळखणं कठीण
निधी भानुशालीची हे फोटो  यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमधील आहेत. या फोटोंमध्ये तिला पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की निधीचे संपूर्ण कुटुंब फोटोंमध्ये दिसत आहे. पण तिच्या नव्या लूकमुळे ती खूपच बदललेली दिसतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करत निधीने लिहिलं की, 'माझ्या घरी दिवाळी आली आहे. प्रत्येकाचे जीवन प्रेम आणि प्रकाशाने भरलेलं जावो. दिवाळीच्या शुभेच्छा.' निधीचा हा नवा लूक अनेकांना आवडला नाही. तिच्या फोटोंवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं,  'तुम्ही हेअर कटिंग का केली? आधी गोंडस दिसत होती. याशिवाय आणखी एका यूजरने लिहिलं, 'ही हेअरस्टाईल तुमच्या चेहऱ्यावर चांगली दिसत नाही. याशिवाय दुसऱ्याने लिहिलं 'पाहता-पाहता हे काय झालं? तु हे करुन घेतलंस स्वत:सोबत.'

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x