मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chasamah) या छोट्या पडद्यावरील मालिकेने चाहत्यांचं गेल्या 14 वर्षांपासून भरभरुन मनोरंजन केलंय. चाहत्यांनीही मालिकेवर दुप्पट प्रेम केलं. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला भरभरुन प्रेम मिळालं. मात्र चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. या कार्यक्रमातील चंपक चाचाची (Champak Chacha) भूमिका करणाऱ्या अमित भट्ट (Amit Bhatt) यांना सेटवर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. (tmkoc taarak mehta ka ooltah chashmah champak chacha aka amit bhatta injured during shooting)
ईटाईम्स टीव्हीच्या रिपोर्टनुसार, अमित भट्ट यांना दुखापत झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे बेड रेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अमित भट्ट यांना शूट करता येणार नाही.
मालिकेतील एका सीनसाठी अमित भट्ट यांना धावायचं होतं. मात्र धावताना त्यांचा तोल गेल्याने ते पडले. पडल्याने त्यांना दुखापत झाली. त्यामुळे भट्ट यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय, अशी माहिती रिपोर्टने मालिकेतील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
दरम्यान भट्ट यांना दुखापत झाल्याने इतर सहकलाकार चिंतेत आहे. तसेच भट्ट दुखापतीतून लवकरात लवकर सावरावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
संबंधित बातम्या
TMKOC : मिनी इंडियाचं दर्शन घडवणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला 14 वर्ष पूर्ण