मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेने सर्वांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या फार जवळचं आहे. मालिकेत काही दिवसांपुर्वीचं आराधना शर्माची (Aradhana Sharma) एन्ट्री झाली. मलिकेच्या माध्यमातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण इथंपर्यंत पोहोचण्यासाठी आराधनाला अनेक वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. त्यातील एक म्हणजे कास्टिंग काऊच.
आराधना मालिकेत गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. आराधनाने नुकताचं एका मुलाखतीत करियरमध्ये आलेल्या वाईट प्रसंगांचा खुलासा केला. टीओआयला दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊचबद्दल सांगितलं. कास्टिंग काऊच एजेंटने तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तवणुकीबद्दल सांगितलं. त्या प्रसंगानंतर ती स्वतःच्या वडिलांना देखील घाबरत होती.
आराधना म्हणाली, 'अनुभवलेला तो वाईट प्रसंग मी आयुष्यात कधीचं विसरू शकत नाही. ही घटना चार-पाच वर्षांपूर्वीची आहे. मी पुण्यात शिकत होती. तेथे एक व्यक्ती होती. तो व्यक्ती मुंबईत कास्टिंगचं काम करत होता. मी पुण्यात मॉडलिंग करायची त्यामुळे माझी ओळख होती.'
'मी रांचीमध्ये गेली, करणा त्या व्यक्तीने रांचीमध्ये कास्टिंग सुरू आहे असं सांगितलं. आम्ही एका खोलीत बसलो होतो. मी स्क्रिप्त वाचत होती. तेव्हा त्याने मला स्पर्ष करण्याचा प्रयत्न केला. काय होत आहे, मला काहीचं कळत नव्हतं. त्याला धक्का द्यायचा, दरवाजा उघडायचा आणि पळून जायचं एवढंच माझ्या समोर होतं.'
आराधना पुढे म्हणाली, 'मी ही घटना काही दिवस कोणालाचं सांगितली नाही.' याआधी आराधनाला तिच्या चेहऱ्यावरून देखील जज करण्यात आलं. 'आम्ही आमचा पोर्टफोलियो कास्टिंग एजेंसिंना पाठवतो आणि त्यामधुन ते एका सुंदर लिडच्या शोधात असतात. त्यासाठी मी देखील माझा पोर्टफोलियो पाठवला.'
'माझ्या पोस्टफोलियोवर ते म्हणाले आम्हाला सुंदर अभिनेत्री हवी आहे. पण तू सुंदर नाहीस. जेव्हा तुला फिट होईल असा काही रोल असेल तर आम्ही तुला सांगू.' सांगायचं झालं तर फक्त आराधनाचं नाही तर कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊच या वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला आहे.