'तुला पाहते रे' मालिकेतील जयदीप या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्य़ाचा मुलगा आहे जयदीप

Updated: Oct 23, 2018, 09:48 AM IST
'तुला पाहते रे' मालिकेतील जयदीप या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा

मुंबई : छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. 

मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टीआरपीचे उच्चांक गाठत आहे. या मालिकेतील सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्यही त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले याने ही भूमिका साकारली आहे.

आशुतोषच्या रक्तातच अभिनय आहे. त्याचे वडिल हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. विजय गोखले यांचा आशुतोष हा लेक. विजय गोखले यांनी विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून रसिकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. त्यांची भूमिका असलेली श्रीमान श्रीमती ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान हिट ठरली. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले. त्यांनी आपला मुलगा आशुतोष याला देखील एका चित्रपटातून अभिनयाची संधी दिली. 

महाविद्यालयीन जीवनापासूनच आशुतोषला अभिनयाची आवड होती. त्यावेळी अनेक एकांकिकामध्ये त्याने सहभाग घेतला होता. आशुतोषने अनेक नाटकातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली. सध्या आशुतोषची जयदीपची भूमिका लोकप्रिय होत आहे आणि प्रेक्षक त्याच्या अभिनय कौशल्याची दाद ही देत आहेत.