मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'उरी-द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपट प्रेक्षकांच्या आवडीस खरा उतरला. निर्मात्यांनी चित्रपट साकारण्यासाठी विशेष मेहनत घेतली. चित्रपट कोठे चित्रीत करायचा हा निर्मात्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता. काश्मीर खोऱ्यांपासुन सुरू करण्यात आलेला शोध शेवटी सर्बियामध्ये संपला. सर्बियामध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. युरोपमधील दक्षिणपूर्व भागात सर्बिया हे देश वसलेले आहे. चित्रपटाच्या शुटिंगकरता आता हा देश भारतासाठी मुख्य स्त्रोत बनला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथे मिळणाऱ्या सवलती. भारतीय नागरिक सर्बियामध्ये तब्बल ३० दिवस परवान्या शिवाय वास्तव्य करू शकतात.
चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांचा हेतू मात्र वेगळाच होता. आईएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात ज्या उपकरणांची नितांत गरज होती, अशी उपकरणे फक्त सर्बियामध्येच उपलब्ध होती. प्रत्येक्षात 'स्पेशल फोर्स'जी हत्यारे वापरतात त्यांची झलक चित्रपटात दाखवण्यात आली आहेत. बंदूक, नाइट विजन गोगेल्स, हेलमेट उपकरणांचा वापर 'स्पेशल फोर्स' करतात. भारतात हे उपकरणे आणणे फार कठीण असल्याचे धर यांनी सांगितले. या वस्तू फक्त युरोप आणि अमेरिकेतच उपलब्ध आहेत.
भारतात हे आवजारे आणण्यासाठी दोन वर्षांचा अवधी लागला असता. त्यामुळे चित्रपटाच्या टीमने सर्बियाला जाण्याचा निर्णय घेतला. चित्रपट वेळेत पूर्ण करायचा होता, त्यामुळे सर्बियाला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्बियाला चित्रपट चित्रीत करण्याचे दुसरे कारण म्हणजे, सर्बियातील भौगोलिक स्थिती काश्मीरला मिळती - जुळती आहे, त्याबरोबर तिकडे शुटिंग करणे फार खर्चिक नसते.
बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची मजल मारलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण अवघ्या ४९ दिवसात पूर्ण करण्यात आले. २५ कोटींच्या बजेटमध्ये चित्रपट साकारण्यात आला आहे. एम4 कारबाइन, एम16 और एके47 राईफल यांच्या प्रतिकृती रूपेरी पडद्यावर दाखवण्यात आल्या आहेत.