मुंबई : 'रंगीला' सिनेमामुळे प्रकाशझोतात आलेली उर्मिला नंतर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली. कधी उर्मिलाचे अफेअर्स तर कधी तिचं खासगी आयुष्य. पण यासोबतच उर्मिलावर एका कलाकाराच्या पत्नीची कानशिलात खाण्याची वेळ आली होती.
उर्मिलाने बालकलाकार म्हणून काम सुरू केलं. तसेच तिने हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला. मात्र ती कायमच चर्चेत राहिली त्याला कारण तिचे अफेअर्स.
राम गोपाल वर्माच्या 'रंगीला' ने उर्मिलाला ओळख निर्माण करून दिली. पहिल्यांदा ती रामूच्या 'सत्या' सिनेमात दिसली. मात्र त्यानंतर रामूच्या प्रत्येक सिनेमात उर्मिला दिसू लागली. त्यानंतर रामगोपाल वर्मा आणि उर्मिलाच्या अफेर्सची चर्चा रंगली.
राम गोपाल वर्मा आणि उर्मिलाने एकत्र १३ सिनेमे केले. यामुळे तिला कुणीच इतर दिग्दर्शक आपल्या सिनेमात कास्ट करत नव्हता. (ज्याच्या प्रेमात उर्मिला उध्वस्त झाली, कोण होता 'तो')
रामगोपाल वर्मा आणि उर्मिलाच्या अफेअरची चर्चा रंगली तेव्हा रामू विवाहित होते. रामू यांची पत्नी रतना हिच्या कानावर या चर्चा पोहोतल्या.
रतनाला हे कळल्यावर तिचा राग अनावर झाला. रतनाने उर्मिलाच्या कानशिलात लगावली. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली.
रतना एवढ्यावरच थांबली नाही तिने राम गोपाल वर्मा यांना घटस्फोट दिला. आणि आपलं नातं तोडलं.
रतना आणि रामू यांचा घटस्फोट झाला तरीही उर्मिला मात्र राम गोपाल वर्मा यांची झाली नाही. हे दोघं त्यानंतरही एकत्र आले नाही.
राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांनी कधीही त्यांचे अफेअर स्वीकारले नाही. पण राम गोपालमुळेच उर्मिला तिच्या करिअरच्या शिखरावर पोहोचली होती. पण उर्मिलाचे करिअरही राम गोपाल वर्मामुळे बुडाले.