फुलपाखरूने गाठला यशस्वी ५०० भागांचा टप्पा

मानस आणि वैदेहीने जिंकली सगळ्यांची मन

Updated: Dec 12, 2018, 04:43 PM IST
फुलपाखरूने गाठला यशस्वी ५०० भागांचा टप्पा title=

मुंबई : रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या फुलपाखरू या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनचपसंती दर्शवली.कॉलेजमधील निरागस प्रेम प्रेक्षकांसमोर आणणारी फुलपाखरू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि त्यातील प्रमुख भूमिकेतील मानस आणि वैदेही ही पात्रं तर त्यांच्या मनात घरकरून बसली आहेत. सोशल मीडियाद्वारे देखील या कलाकारांवर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करतात.

या मालिकेने नुकताच ५०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे. ५०० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार आणि त्यांनी हा आनंद  मालिकेच्या सेटवर केक कापूनसाजरा केला. यावेळी फुलपाखरूमालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. संपूर्ण टीम जिच्यामुळे हि मालिका यशस्वीरित्या ५०० भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले गेले. हा आभारप्रदर्शनानंतर त्यांनी सेटवर केक कापून साजरा केला आणि या यशाच्यामागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला.

कार्यक्रमावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यातकाही शंका नाही. कलाकारांनी सांगीतले की कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठीचाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मकआणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या मोठ्या दिवसाविषयी बोलताना, हृता दुर्गुळे म्हणाली, "५०० भागांचा यशस्वी टप्पा गाठणे ही आम्हा सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. फुलपाखरू या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंआणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच हा आनंद आम्ही फुलपाखरूच्या संपूर्ण टीमसोबत साजरा केला.

ज्यांच्यामुळे हि मालिका ५०० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण करू शकलीआणि अर्थातच या आनंदाच्या क्षणी मी रसिक प्रेक्षकांचे आभारमनू इच्छितो ज्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं आणि ती पुढेही आमची अशीच साथ देतील अशी अशा करते."

मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारावून गेलेला, मानसची भूमिका करणारा अभिनेता यशोमन आपटे म्हणाले, “हा टप्पा पार केल्यामुळे आम्हाला सर्वांना अतिशय आनंद झाला आहे.आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या आमच्यासर्व चाहत्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. हा एक सुंदर प्रवास होता आणि मला आशा आहे की आम्ही असेच अनेक टप्पे पार करू.”