व्हिडिओ : 'सुई-धागा'च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा 'हात'

हा सिनेमा येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे

Updated: Aug 8, 2018, 09:18 AM IST
व्हिडिओ : 'सुई-धागा'च्या लोगोत  देशभरातील १५ कलाकारांचा 'हात' title=

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या 'सुई-धागा : मेड इन इंडिया'च्या कामात व्यस्त आहेत. यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचा लोगो नुकताच लॉन्च करण्यात आला... पण हा लोगो म्हणजे एक नाही तर अनेक कलाकारांची मेहनत आहे. अनुष्का आणि वरुणनं या सिनेमाचा लोगो कसा बनला त्याची कहाणी एका व्हिडिओतून समोर मांडलीय. 

या लोगोसाठी यशराज टीमनं देशभरातील अनेक कलाकारांना गाठलं... आणि त्यांच्याकडून या युनिक लोगोचं काम पार पडलं. 

कश्मीरची कशीदा आणि सोजनी, पंजाबची फुलकारी, उत्तरप्रदेशची फुलपट्टी, लखनऊची जरदोसी, राजस्थानची आरी, बंजारा आणि गोटा पट्टी यांसारख्या अनेक कलांचा या लोगोत समावेश आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन कलेंय शरत खटारिया यांनी... हा सिनेमा येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.