वरुण धवननं 'गोविंदा'ला हटवलं

वरुण धवन आणि गोविंदा यांच्यामधल्या वादानं आता टोक गाठलं आहे. 

Updated: Sep 25, 2017, 06:20 PM IST
वरुण धवननं 'गोविंदा'ला हटवलं title=

मुंबई : वरुण धवन आणि गोविंदा यांच्यामधल्या वादानं आता टोक गाठलं आहे. जुडवा २ या चित्रपटाच्या टन टना टन या गाण्यातून गोविंदाच्या नावाचा उल्लेख हटवण्यात आला आहे. 'गोविंदा है हिरो उसका और माधुरी हिरोईन है' असे बोल असलेल्या या गाण्यातून गोविंदाचं नाव हटवण्यात आलं आहे.

वरुण धवनचे वडिल डेव्हिड धवन आणि गोविंदा यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण वरुण आणि गोविंदा यांच्यामध्ये मात्र वाद असल्याचं बोललं जातं. वरुणची तुलना गोविंदासोबत केली असता गोविंदा चांगलाच भडकला होता. वरुणसोबतची तुलना गोविंदाला अजिबातच रुचलेली नव्हती.

वरुण धवन याचा जुडवा २ हा चित्रपट २९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. १९९७ मध्ये आलेल्या सलमान खानच्या जुडवा चित्रपटाचा हा रिमेक आहे. डेव्हिड धवनचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामध्ये वरुण धवनबरोबर तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल, असं बोललं जातंय.