Varun Dhawan होणार बाबा? पत्नीच्या प्रेग्नन्सीवर अभिनेत्याचं मोठ वक्तव्य

Varun Dhawan चा भेडिया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिका साकारणार आहे. 

Updated: Nov 25, 2022, 03:25 PM IST
Varun Dhawan होणार बाबा? पत्नीच्या प्रेग्नन्सीवर अभिनेत्याचं मोठ वक्तव्य title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची पत्नी नताशा दलाल (Natasha Dalal) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी वरुण आणि नताशा आई-वडील होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. वरुण सध्या 'भेडिया' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वरुणच्या 'भेडिया' या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनन त्याच्यासोबत मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळी अनेकांनी वरुणला त्याच्या पत्नी नताशाच्या प्रेग्नन्सीबद्दल शुभेच्छा दिल्या. दरम्यान, यावेळी वरुणनं पत्नी नताशाच्या प्रेग्नन्सीबद्दल मौन सोडलं आहे. 

हेही वाचा : 'मुलींसोबत खेळू नका...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik हे काय बोलून गेली

वरुणनं इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, नताशा प्रेग्नंट नाही आणि आता तो आणि त्याची पत्नी एका कुत्र्याचे पालक आहेत. यानंतर, अभिनेत्याने सांगितले की येत्या काही वर्षांत ते आई-वडील होतील.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे वरुण म्हणाला, त्याला लहानपणी लग्न करायचे नव्हते आणि तो असे करेल असे त्याला कधीच वाटलं नव्हतं. तो पुढे म्हणाला की जेव्हा तो त्याची पत्नी नताशा दलालला भेटला तेव्हा त्याला वाटलं की कोणीतरी आहे जी त्याला कोणत्याही परिस्थितीत समजून घेऊ शकते आणि जिच्यात लग्न म्हणजे समजूतदारपणा. 

वरुणनं वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या त्याच्या आजारा विषयी केला होता खुलासा

दरम्यान, वरुणनं सांगितलं की तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) नावाच्या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. सगळ्यांना प्रश्न पडला असेल की वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे काय? वेस्टिब्युलर हायपोफंक्शन लक्षणं कोणती आहेत? त्याच्यावर उपचार कसा करायला हवा? आणि वेस्टिब्युलर हायपोफंक्शन होऊ नये म्हणून नक्की काय करायला हवं. 

वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे काय? (What is Vestibular Hypofunction?)

वेस्टिब्युलर हायपोफंक्शन ही एक अशी स्थिती आहे जी एखाद्या व्यक्तीच्या संतुलनावर परिणाम करते. कानाचा आतील भाग जो तुमच्या बॅलन्स सिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग आहे तो नीट काम करत नाही तेव्हा असं होतं. या आजारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तीची वेस्टिब्युलर प्रणाली (Vestibular System) योग्यरित्या तुम्हाला प्रतिसाद देत नाही आणि मेंदूला चुकीचा मेसेज पाठवते. यामुळे, त्या रुग्णाला चक्कर येते. फोर्टिस रुग्णालयातील ईएनटी एक्सपर्ट डॉ. विदित त्रिपाठी यांच्या मते, "यामुळे ज्या अवयवांमुळे आपले संतुलन राहते त्यांच्यात असंतुलन निर्माण होते. जे एका व्हायरल इन्फेक्शमुळे होऊ शकते किंवा कधी काही वेगळी कारणेही असू शकतात. कधी हे थोड्याच काळासाठी असते किंवा कधी हे कायम स्वरूपी राहते. पण बहुतांश लोक हे थोड्या दिवसात किंवा आठवड्यांमध्ये बरे होऊ शकतात. हा गंभीर आजार नाही आणि योग्य औषधोपचार आणि व्यायाम केला तर तुम्ही लवकर बरे होऊ शकता.