Rajkumar Kohli Passes Away: ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार कोहली यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे आज सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं आणि परिवार आहे. बॉलिवूडमधल्या अनेक लोकप्रिय आणि मानांकित सेलिब्रेटींनी त्यांना श्रद्धाजंली वाहिली आहे.
'जानी दुश्मन : एक अनोखी कहानी', 'पती पत्नी और वो', 'नागिन', 'लुटेरा' अशा अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. त्यांचा मुलगा अरमान कोहली हा देखील एक लोकप्रिय अभिनेता आहे. 'जानी दुश्मन : एक अनोखी कहानी' या चित्रपटातून त्यानं महत्त्वाची भुमिका केली होती. त्यात त्यानं विलन साकरला होता. त्याच्या या भुमिकेचे प्रचंड कौतुक करण्यातही आले होते. त्यानं अनेक चित्रपट केले आहेत परंतु त्यानंतर तो फारसा कुठल्या चित्रपटात दिसला नाही. त्यानं बिग बॉस या शोमध्येही सहभाग दर्शवला होता. त्यांना दुसरा मुलगाही आहे. त्याचे नावं गोगी आहे.
ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, राजकुमार हे आंघोळीसाठी केले होते. परंतु बराच काळ ते बाहेर आले नाहीत. त्यामुळे अरमान त्यांच्या बेडरूमपाशी गेला. त्यानं दरवाजा तोडला आणि ते जमिनीवर खाली कोसळले होते. तेवढ्यात कुटुंबियांनी त्यांना रूग्णालयात नेले आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 1963 पासून त्यांनी चित्रपटातून कामं करायला सुरूवात केली आहे. त्यांनी प्रेम चोप्रा यांचा अभिनय असलेल्या 'सपनी' या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी यानंतर अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली जे खूप लोकप्रिय ठरले होते.
'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाच्या निमित्तानं ते शेवटचे दिसले होते. त्यांनी 'नागिन', 'बदले की आग', 'नौकर बीवी का', 'राज टिलक' अशा चित्रपटांची निर्मिती केली होती. सध्या या चित्रपटांची बरीच चर्चा रंगलेली आहे. त्याचसोबतच त्यांनी 'गोरा और काला', 'डंका', 'डुला भट्टी', 'लुटेरा', 'मैं जाती पंजाब दी', 'पिंड दी कुऱ्ही' अशाही चित्रपटांची निर्मिती केली आहे. यावेळी अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक लोकप्रिय आणि अजरामर चित्रपट केले आहेत. त्यांचे चित्रपट हे बॉक्स ऑफिस प्रचंड गाजले होते. त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले होते.