हनी सिंगच्या गाण्यावर चिमुकलीचा धमाल डान्स

...

Updated: Jun 18, 2018, 09:12 AM IST

मुंबई : आपला फोटो किंवा कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करणं एक सामान्य गोष्ट झाली आहे. तसेच सोशल मीडिया हे एक प्रसिद्धीचं माध्यमही बनत चाललं आहे. एखाद्या गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड केल्यावर अनेकांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळते. काही दिवसांपूर्वी डान्सिंग अंकलचा गोविंदा स्टाईल डान्स व्हिडिओही अशाच फेसम झाला आणि त्याला नागरिकांचीही मोठी पसंती मिळाली.

आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. एका चिमुकलीने केलेल्या डान्सचा व्हिडिओने सर्वांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओत एक ३ वर्षांची चिमुकली बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करत आहे.

बॉलिवूडमधील हिट डान्सिंग नंबर 'दिल चोरी साड्डा हो गया' या गाण्यावर चिमुकलीने जान्स केला आहे. आपल्या डान्समुळे ही चिमुकली खूपच प्रसिद्ध झाली आहे.