Vidya Balan Secret Daughter: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता विद्या बालन एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. त्याचवेळी तिच्यासोबत एक 14 ते 15 वर्षांची एक मुलगी दिसून आली होती. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. विद्यासोबत दिसणारी युवती ही तिचीच मुलगी असल्याचे तर्क लढवले जात होते.
विद्या आणि त्या मुलीच्या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले होते. त्यात विद्या तिच्या क्यूट मुलीसोबत असं पॅपाराजीने लिहलं होतं. त्यामुळं ही विद्याचीच मुलगी असल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती. विद्या बालनची सिक्रेट मुलगी असून तिने जगापासून हे सत्य लपून ठेवले होते का?, असं काहींनी म्हटलं होतं. विद्याच्या मुलीच्या अफवा सुरू झाल्यानंतर अखेर अभिनेत्रीनेच खरं काय ते सांगून चर्चांना पूर्णविराम दिला.
एका वृत्तपत्रेला दिलेल्या माहितीनुसार, विद्याने विमानतळावर तिच्यासोबत असलेल्या मुलीची माहिती दिली आहे. तिने म्हटलं आहे की, ती माझ्या बहिणीती मुलगी आहे. तिला जुळी मुलं आहेत. एक मुलगा रुहान आणि मुलगी ईरा , अशी त्यांची नावे आहेत.
विद्या आणि तिच्या बहिणीच्या मुलीसोबतचे नाते खास आहे. व्हिडिओत दोघींचे एकमेकांसोबतचे वागणे व बोलणे पाहून या माय-लेकीच आहेत की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, विद्याने या सगळ्या अफवा असल्याचे सांगत त्यावर पूर्णविराम दिला आहे.
विद्या बालनने 2012 रोजी एका मुलाखतीत तिच्या आणि फिल्ममेकर सिद्धार्थ रॉय कपूरच्या नात्याविषयी खुलासा केला होता. त्याचवर्षी 14 डिसेंबर रोजी विद्या आणि सिद्धार्थने लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला 11 वर्ष झाली आहेत.
लग्नाच्या 11 वर्षांनंतर मुलांबाबत काय विचार आहे, असं प्रश्न एकदा विद्याला केला होता. त्यावर रागातच तिने उत्तर दिले होते. मी मुलाना जन्म देणारी मशिन नाहीये, असं तिने म्हटलं होतं. त्याचबरोबर जगात इतकी लोकसंख्या वाढत असताना जर काही लोकांना मुलं नसतील तर त्याच चुकीचे काय आहे?, असा सवाल तिने केला होता.
विद्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, नियत हा तिचा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला होता. मात्र, या सिनेमाला फार काही यश मिळालं नाही. लवकरच विद्या बालनचा लवर्स हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.