लग्नासाठी सज्ज विजय देवरकोंडा? अभिनेत्याच्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण...

 मात्र यावेळी स्वत: अभनेत्याने त्याच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. याआधी अभिनेत्याचं नाव रश्मिका मंदानासोबत जोडलं गेलंय.  दोघंही गुपचूप एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात होतं. अनेकदा ही जोडी एकमेकांसोबत स्पॉटही झाली आहे.

सायली कौलगेकर | Updated: Aug 11, 2023, 01:45 PM IST
लग्नासाठी सज्ज विजय देवरकोंडा? अभिनेत्याच्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण... title=

मुंबई : अभिनेता विजय देवरकोंडा हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आहे. अभिनेता त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तो कायमच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. 'कुशी' हा त्याचा आगामी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत सामंथा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमामुळे तो चर्चेत आहेच. मात्र अजून एका वेगळ्या कारणामुळे विजय चर्चेत आहे. आणि याचं कारण आहे की, त्यांचं लग्न. असं म्हटलं जातंय की, लवकरच विजय लग्नबंधनात अडकणार आहे.  

याआधी विजयच्या लग्नाच्या अनेक अफवा सुरु होत्या. मात्र याविषयी प्रत्येक वेळी अभिनेत्याने मौन बाळगलं आहे.  मात्र यावेळी स्वत: अभनेत्याने त्याच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. याआधी अभिनेत्याचं नाव रश्मिका मंदानासोबत जोडलं गेलंय.  दोघंही गुपचूप एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात होतं. अनेकदा ही जोडी एकमेकांसोबत स्पॉटही झाली आहे. एवढंच नव्हेतर हे कपल अनेकदा वेकेशनला गेल्याचंही बोललं गेलंय. मात्र रश्मिका आणि विजयने आपल्या रिलेशनशिपवर बोलणं टाळलंय. मात्र आता पुन्हा एकदा अभिनेता लग्नामुळे चर्चेत आला आहे. 

सध्या अभिनेत्याचं लग्नाबाबतचं वक्तव्य खूप चर्चेत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावेळी विजय देवरकोंडा म्हणाला, 'मला लवकर लग्न करायची गरज आहे. मला माहितीये आहे की, खूप घाई होईल.  मी घाबरलो नाहीये आणि आता या कल्पनेने मी कंफर्टेबल झालो आहे. आधी लग्न हा एक असा शब्द होता जो माझ्या आजूबाजूला कोणालाही म्हणण्याची परवानगी नव्हती. मी लगेच चिडायचो. मात्र मी आता त्याच्याबद्दलच  बोलत आहे.

विजय देवराकोंडा जोडीदाराच्या शोधात आहे
अभिनेता पुढे म्हणाला, 'मी आता माझ्या मित्रांची लग्न करताना पाहत आहे आणि मी त्याचा आनंद घेत आहे. प्रत्येकाने अनुभवावा असा हा जीवनाचा अध्याय आहे. मी वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहे. मी काही दिवसांपासून जोडीदाराच्या शोधात आहे. मी अजून लग्नासाठी तयार नाही... मात्र काही वर्षात हे होऊ शकतं. आता एका कार्यक्रमादरम्यान, विजयने लग्नासाठी तयार होण्याबद्दल खुलेपणाने आपलं मत व्यक्त केलं आहे. आणि असंही म्हटलं आहे की, तो अजूनही जोडीदाराच्या शोधात आहे.

विजयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, विजय 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लिगर' चित्रपटात दिसला होता. आता तो सामंथा रुथ प्रभूसोबत 'कुशी' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे आणखी दोन चित्रपट आहेत.