रणवीर सिंहची ड्रेसिंग स्टाईल या पक्ष्यांशी मिळती जुळती. हुबेहुब फोटो पाहूण तुम्ही देखील व्हाल हैराण

बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) अगदी काही वर्षांतच आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान मिळवले आहे.

Updated: Apr 18, 2021, 06:48 PM IST
रणवीर सिंहची ड्रेसिंग स्टाईल या पक्ष्यांशी मिळती जुळती. हुबेहुब फोटो पाहूण तुम्ही देखील व्हाल हैराण

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) अगदी काही वर्षांतच आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान मिळवले आहे. प्रत्येक चित्रपट यशस्वी करण्यासाठी तो संपूर्ण प्रयत्न करतो. परंतु तो नेहमीच त्याच्या हटके आणि वेगळ्या प्रकारच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असतो. त्याच्या काही चाहत्यांना त्याचा हा अंदाज खूप आवडतो, तर काही लोकं त्याला त्याच्या कपड्यांमुळे ट्रोल करतात. परंतु रणवीरवर त्याचा काही एक परिणाम होत नाही. तो आपल्या त्याच अंदाजात सगळ्यांसमोर येतो.

सध्या रणवीर सिंगचे काही फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याची ड्रेसिंग स्टाईल अगदी पक्ष्यांशी मिळती जुळती आहे.

Bhrigzz नावाच्या एका ट्विटर युजरने हा फोटो शेअर केले आहे. आणि त्याला कॅप्शन लिहिले आहे, 'रणवीर सिंह भारतीय पक्षांप्रमाणे'
हा ट्वीट इतका व्हायरल झाला आहे की, आता बरेच लोक रणवीर सिंहच्या ड्रेसिंगशी मिळत्या जुळत्या आणखी काही पक्ष्यांसोबत फोटो शेअर करत आहेत.