आयुषमानची पत्नी मुलाला 'गे'चा अर्थ विचारते तेव्हा...

ताहिरा उत्तर ऐकताचं झाली भावूक   

Updated: Jan 27, 2020, 09:28 PM IST
आयुषमानची पत्नी मुलाला 'गे'चा अर्थ विचारते तेव्हा...

मुंबई : 'बधाई हो', 'आर्टिकल १५' आणि 'बाला' सारखे अफलातून चित्रपट आतापर्यंत आयुषमान घेऊन आला आहे. आता तो 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात तो गेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर आयुषमानची पत्नी ताहिरा कश्यपने मुलाला 'तुला गेचा अर्थ माहित आहे का?' असा प्रश्न विचारला. तेव्हा मुलाकडून मिळालेल्या उत्तराने ती भावूक झाली. 

यासंदर्भात तिने एक ट्विट सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. 'वडिलांच्या आगामी चित्रपटावरून मी मुलाला विचारले की तुला होमोसेक्सुअलिटी आणि गेचा अर्थ माहित आहे का? तो म्हणाला, हो मला माहित आहे. शिवाय मला त्यावर कोणत्याही प्रकारची हरकत नाही.' असं उत्तर त्याने आपल्या आईला दिले. 

मुलाचं हे उत्तर ऐकताच ताहिरा अत्यंत भावूक झाली. आयुषमान खुरानाचा नवा चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'समलैंगिक' प्रेमसंबंधावर आधारित या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

आतापर्यंत सगळे हिट चित्रपट देणाऱ्या आयुषमान खुरानाच्या या चित्रपटाची देखील खूप उत्सुकता आहे. २१ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समलैंगिक प्रेमप्रकरणावर प्रकाश टाकला आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा आयुषमान गे ची भूमिका साकारणार आहे. 

लव इंटरेस्टचा रोल साकारताना आयुष्मान दिसत आहे. आयुषमानसोबत नीना गुप्ता आणि गजराज राव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानाच्या अपोझिट कोटा फॅक्टरी स्टार जितेंद्र कुमार आपल्याला दिसणार आहे.