Neha Kakkar चा आवाज ऐकून अनू मलिकने मारली होती स्वतःच्याच कानाखाली

पुन्हा नेहाचा व्हिडिओ व्हायरल 

Updated: Apr 12, 2021, 02:45 PM IST
Neha Kakkar चा आवाज ऐकून अनू मलिकने मारली होती स्वतःच्याच कानाखाली  title=

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्करचा(Neha Kakkar)  आवाज आज करोडो लोकांना आवडत आहे. नेहाने मेहनत आणि जिद्दीने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. नेहा कक्कर आता रिऍलिटी शो इंडियन आयडल (Indian Idol) मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. एक वेळ अशी होती की नेहा याच शोमध्ये स्पर्धक म्हणून आली होती. (Anu Malik slapped himselfi after listen Neha Kakkar's Song) सध्या नेहाचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

नेहाचा हा व्हिडिओ अतिशय जुना आहे. यामध्ये नेहा इंडियन आयडल 2 मध्ये स्पर्धक बनून आली आहे. या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत सोनू निगम, फरहान खान आणि अनू मलिक होते. नेहाने रिफ्यूजी सिनेमाचं लोकप्रिय गाणं 'ऐसा लगता है' गायलं आहे. या गाण्यावर अनू मलिकची प्रतिक्रिया बघून कुणीही हैराण होईल. 
          

या व्हिडिओत नेहा कक्करचं गाणं ऐकल्यावर अनु मलिक म्हणतात,'नेहा कक्कर, तुझा आवाज ऐकून मला स्वतःच्याच कानाखाली मारून घ्यावसं वाटत आहे.' या व्हिडिओत नेहा कक्करचा गाणं संपल्यावर अनु मलिक कानाखाली मारत आहेत. इंडियन आयडल 2 मध्ये नेहा स्पर्धक होती. तसेच आता इंडियन आयडल 12 मध्ये नेहा स्वतः परिक्षकाची भूमिका साकारत आहे. नेहासोबत आता हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी देखील परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अ़डकलेल्या गायिका नेहा कक्करचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होते.  गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा विवाह मोठ्या थाटात पण कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. दिल्लीतील गुरुद्वाऱ्यात सर्व विधींसह नेहा आणि रोहनप्रीतचा विवाहसोहळा पार पडला. विवाहानंतर नेहा पुन्हा आपल्या कामाला लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे नेहाच्या स्टायलची कायम चर्चा होत असते.