मुंबई : बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री नर्गिस फाखरी यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1979 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. फाखरीच्या वडिलांचं नाव दिवंगत मोहम्मद फखरी असून ते पाकिस्तानचे होते. त्यांच्या आईचं नाव मेरी असं आहे. जेव्हा अभिनेत्री 6 वर्षांची होती तेव्हा तिचे पालक वेगळे झाले. यानंतर त्यांच्या वडिलांचंही निधन झालं. नर्गिस फाखरी ही भारतीय-अमेरिकन मॉडेल आहे. नर्गिस अमेरिकेतील रिअॅलिटी शो अमेरिकन मॉडेल सीझन 2 चा देखील भाग आहे.
तिने भारतातील अनेक मोठ्या फॅशन शोमध्ये मॉडेल म्हणून रॅम्प वॉक केला आहे. नर्गिस फाखरी चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. इन्स्टावर तिचे सुमारे 7.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत यावरून अभिनेत्रीच्या चाहत्यांची कमतरता नसल्याचं दिसून येते.
नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आज 20 ऑक्टोबर 2022 रोजी तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमेरिकन मॉडेल-अभिनेत्री बनलेली नर्गिस तिच्या सुंदर आणि ग्लॅमरस लूकने पडद्यावर अधिराज्य गाजवते. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत 2011 च्या हिट चित्रपट 'रॉकस्टार'मधून पदार्पण केल्यानंतर नर्गिस फाखरीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.
'मैं तेरा हीरो', 'हाउसफुल 3', 'मद्रास कैफे', 'अजहर' सारख्या सिनेमामध्ये अभिनय करुन तिने आपल्या चाहत्यांना वेड लावलं आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षात नर्गिस कुठेच दिसली नाही . मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून नर्गिस फाखरीने चित्रपट जगतापासून दूर आहे. पुन्हा एकदा नर्गिसची एक जुनी मुलाखत खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की ती कास्टिंग काउचची शिकार झाली आहे.
नर्गिस फाखरी कास्टिंग काउचची शिकार झाली आहे
नर्गिस फाखरीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. एवढंच नव्हेतर नर्गिसने दिग्दर्शकासोबत शारिरीक संबध ठेवण्यासही नकार दिला होता, ज्यामुळे तिला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं होतं.
दिलेल्या या मुलाखतीत नर्गिस म्हणाली की, ' मला कशाची भूक लागली आहे. हे मला नेहमीच माहिती होतं. मला प्रसिद्धीची भूक कधीच नव्हती त्यामुळे मी काहीही करायला तयार नव्हते. न्यूड होऊ शकत नाही किंवा दिग्दर्शकासोबत शारिरीक संबध ठेवू शकत नाही. यामुळेच मी अनेक संध्या गमावल्या होत्या आणि ते हृदयद्रावक होते.
नर्गीस फाखरी हिने रॉकस्टार चित्रपटानंतर मद्रास कॅफे या चित्रपटातही काम केलं. या चित्रपटात तिची भूमिका छोटी होती. मात्र, ही भूमिका देखील लक्षवेधी होती. त्यानंतर 'फटा पोस्टर निकला हिरो' हा चित्रपट केला होता. मात्र या चित्रपटात तिच्यापेक्षा अभिनेत्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली होती.
आतादेखील नर्गीस फाखरी हिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. या वर नर्गीस फाखरी म्हणाली की, लोक माझ्या ओठांवर बोलतात. मी काय बोलावे तेच मला कळत नाही. लोक असं का करत असतील, हे मला समजत नाही. जर माझे स्तन मोठे असते तर लोक माझ्या स्तनाबद्दल देखील बोलले असते. असं बोलत तिने नाराजी व्यक्त केली.