Jubin Nautiyal girlfriend : बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरण. झगमगत्या विश्वात कधी कोणाचं कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. सध्या चर्चा रंगत आहे गायक झुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) आणि निकिता दत्ता (Nikita Dutta) यांच्या अफेअरची. एवढंच नाही तर अनेकदा दोघांच्या लग्नाच्या अफवांनी देखील जोर धरला होता. झुबिनने रंगणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं होतं. पण तरी देखील दोघे एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर येत आहे. (Jubin Nautiyal girlfriend)
आता जुबिन आणि निकिता नव्या व्हिडीओच्या माझध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आहे. गाण्यामधील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. गाण्यानंतर दोघांमधील प्रेमाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. मात्र, आता झुबिन आणि निकिता या दोघांनीही अशा बातम्यांवर प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. (Jubin-Nikita)
खुद्द निकिता दत्ताने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. निकिता म्हणाली, 'रंगणाऱ्या चर्चांचा आम्हाला दोघांना काही फरक पडत नाही. आम्ही दोघे आता यावर बोलणं टाळतो. रंगणाऱ्या चर्चांचा आमच्या मैत्रीवर परिणाम होत नाही. आजही आम्ही चांगले मित्र आहोत.' (Jubin Nautiyal and Nikita Dutta)
नात्याच्या चर्चांवर झुबिनेनं दिलेलं स्पष्टिकरण
जुबिन म्हणाला, "निकिता आणि मी जुहूच्या एका कॅफेमध्ये हँग आऊट करत होतो. आम्ही डेट करत आहोत की नाही यावर मला भाष्य करायला आवडणार नाही, कारण एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडते आणि याबाबत चर्चा व्हावी असं आम्हाला वाटत नाही."
काही दिवसांपूर्वी झुबिन आणि निकिता एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले होते, त्यानंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एकमेकांना डेट करत असल्याची बातमी व्हायरल होऊ लागली. पण दोघांनी आम्ही डेट करत नसल्याचं सांगितलं आहे.