close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

यामी गौतमचं सोशल मीडिया अकाऊंटवर हॅकर्सच सावट

अभिनेत्री यामी गौतमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हॅकर्सच सावट घोंघावतय.

Updated: May 12, 2018, 01:21 PM IST
यामी गौतमचं सोशल मीडिया अकाऊंटवर हॅकर्सच सावट
मुंबई : अभिनेत्री यामी गौतमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हॅकर्सच सावट घोंघावतय. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसात यामी गौतमच सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. या सर्व प्रकारामुळे ती खूप व्यतिथ झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटचा चुकीच्या पद्धतीने वापर होतोय अशी कुणकुण तिला लागल्यावर तिने गांभीर्याने ही गोष्ट घेतली.
 

#throwbackthursday #nofilter 

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

यासंदर्भात तिने मुंबई सायबर क्राइम डिपार्टमेंटला तक्रारदेखील केली.

पोलीस लवकरच दोषींवर कारवाई करतील असा तिला विश्वास आहे.

तिच्या सिनेमांबद्दल बोलायच झालं तर गेल्यावर्षी काबिल आणि सरकार ३ सिनेमांमधून तिने उत्तम अभिनय केला.  यानंतर आता लवकरच विकी कौशलसोबत 'उरी' सिनेमात ती दिसणार आहे. हा सिनेमा २०१६ मध्ये भारतीय सैनिकांवर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यावर आधारित आहे.

 

Twirling my way forward #dancelover #bollywood #twirl @dimplekotecha

A post shared by Yami Gautam (@yamigautam) on

या सिनेमासोबतच यामी ही शाहिद कपूरसोबत 'बत्ती गुल मीटर चालु' सिनेमात दिसणार आहे.