'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेच्या सेटवर 'सैराट' होळी

'सैराट झालं जी' या गाण्यावर स्विटू आणि ओम होळीचे रंग एकमेकांना लावताना दिसत आहेत

Updated: Mar 26, 2021, 07:24 PM IST
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेच्या सेटवर 'सैराट' होळी

मुंबई  : 'येऊ कशी तशी मी नांदायला' या लोकप्रिय मालिकेतील ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, मालिकेतील आता होळीचा सिक्वेन्स शूट होत आहे. होळीच्या निमीत्ताने स्विटू आणि ओम होळी खेळताना दिसत आहेत. 'सैराट झालं जी' या गाण्यावर स्विटू आणि ओम होळीचे रंग एकमेकांना लावताना दिसत आहेत.. स्विटू आणि ओमची ही पहिलीच होळी आहे...यावर्षीची होळी ओम आणि स्विटू प्रेमाचे रंग उधळताना दिसत आहेत... या भागात अनेक ट्विस्ट असल्यानं या भागाची उत्सुकता चाहत्यांमध्ये कमालीची दिसत आहे

यातील स्वीटू आणि ओमकारशिवाय मालविका, रॉकी, नलू, मिसेस खानविलकर ही मुख्य पात्र प्रेक्षकांना आवडत आहेत. 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही झी मराठी वाहिनीवरील मालिका जानेवारी महिन्यात सुरु झाली आहे.

या मालिकेतील स्वीटू आणि ओमकार प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळतय. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसंच ही मालिका एवढी लोकप्रिय झाले आहे की, या मालिकेतील काही सिन्सवर सध्या भन्नाट मीम्स देखील व्हायरल होत आहेत

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेची कथा स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी या पात्रांभोवती फिरत आहे. तसेच एका गरीब घरातील मुलगी श्रीमंत घरातील सून होणार असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर हे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.