Panchayat 2: 'पंचायत 2' पाहिली असेल, तर आताच पाहा 'त्या' साध्याभोळ्या रिंकीचे Hot Photos

नवं कथानक, जुने कलाकार आणि बरंच मनोरंजन या साऱ्याच्या बळावर पुन्हा एकदा 'पंचायत'चीच चर्चा सुरु आहे. 

Updated: May 23, 2022, 09:23 AM IST
Panchayat 2: 'पंचायत 2' पाहिली असेल, तर आताच पाहा 'त्या' साध्याभोळ्या रिंकीचे Hot Photos  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Panchayat 2: amazon prime वर अत्यंत गाजलेली आणि तितकीच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली वेब सीरिज Panchayat 2 आता एका नव्या रुपात, नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवं कथानक, जुने कलाकार आणि बरंच मनोरंजन या साऱ्याच्या बळावर पुन्हा एकदा 'पंचायत'चीच चर्चा सुरु आहे. 

वेब सीरिजच्या पहिल्या पर्वाला लोकप्रियता मिळाल्यानंतर आणि दुसऱ्या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचवल्यानंतर आता सीरिजच्या दुसऱ्या पर्वानेही सर्वांना चांगलंच Entertain केलं आहे. 

रघुबीर यादव, नीना गुप्ता, जितेंद्र कुमार यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या सीरिजमध्ये या नव्या पर्वात आकर्षणाचा विषय आहे, ती म्हणजे रिंकी. अर्थात अभिनेत्री सान्विका. (Panchayat 2 on amazon prime)

सान्विका (Sanvikaa)नं या सीरिजमध्ये प्रधान, अर्थात सरपंचचांच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. सीरिजमध्ये जरी ती कायमच साध्याभोळ्या रुपात आणि तशाच लूकमध्ये दिसत असली, तरीही प्रत्यक्षात मात्र ती बरीच ग्लॅमरस असल्याचं दिसत आहे. 

सोशल मीडियावर सान्विका एकाहून एक सरस असे फोटो शेअर करताना दिसते. तिच्या फोटोंना असंख्य लाईक्सही येतात. 

सध्या सान्विकाबदद्ल अधिक माहिती जाणून घेण्यासाठीसुद्धा बरेचजण गुगलची मदत घेताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे ही वेब सीरिज आता सान्विकाच्या भूमिकेला आणि एक व्यक्ती म्हणून तिला किती लोकप्रिय करणार आणि पुढे याच बळावर तिला कोणत्या संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.