मुंबई : अॅसिडीटीने अनेकांना हैराण केलं आहे, जेवणाची आणि झोपण्याची वेळ सतत पुढे ढकलली जात असल्याने हा त्रास सुरू झाला आहे. ही वेळ तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा, पण त्या शिवाय खाली दिलेला उपाय नक्कीच करून पाहा. यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. एवढंच नाही या उपायाने तुमच्या शरीराची अतिरिक्त चरबी म्हणजेच फॅटस देखील कमी होणार आहे. शरीरातील फॅटस कमी झाल्याने अनेक आजार तुमच्यापासून लांब राहतात.
पण जर शरीरात सतत फॅटस वाढत असतील तर ते निश्चितच गंभीर आहे. यामुळे अनेक आजार हळूहळू तुम्हाला हैराण करतात. तेव्हा काही साधे सोपे उपाय तुम्हाला या वजन वाढण्यापासून तसेच अॅसिडीटीपासून मुक्त करणारे आहेत.
मात्र खालील उपाय करताना, तुमच्या पोटाचा आजार जास्तच वाढला असेल किंवा अधिक समस्या असेल, तुमच्यावर उपचार सुरू असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तसा हा उपाय अजिबात अपायकारक नाही.
तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास असेल, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्याचं टेन्शन आलं असेल, तर सकाळी सकाळी कोमट ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून प्यायला सुरूवात करा, सकाळी लवकर उठल्यावर सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू पाणी घ्या.
तुम्हाला पोटाचे गंभीर विकार असल्याचं हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. लिंबू पाण्यामुळे एका आठवड्यातच तुम्हाला अॅसिड़ीटीपासून मुक्तता मिळू शकते, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्यातही मोठी मदत होते.
लिंबू आणि कोमट पाण्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो. किडनीशी संबंधित तक्रारी देखील दूर होण्यास मदत होते. अन्न पचनात मोठी मदत होते.
एकदा हा प्रयोग करून पाहा, आठवड्याभरात फरक पडेल, लिंबू पाण्यात चमचाभर मध घेतल्यास आणखी मोठा फायदा होतो. फक्त कोमट पाण्यात लिंबू घेतांना ते जास्त फ्रेश आणि रसरशीत असतील याकडे लक्ष द्या. या उपायात सातत्य असणे गरजेचे आहे.