Aloe Vera soap recipe: सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे सगळ्यांनाच आपल्या त्वचेच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. अनेकदा त्यांना आपल्या आपल्या त्वचेचीही काळजी घेता येत नसते खूपदा आपण त्याकडेही दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरही अनेक सुरकूत्या आणि डार्क सर्कल्सही (Skin Problems) दिसायला लागतात. परंतु आपल्याला या सगळ्या गोष्टींची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण महागड्या कॉस्मॅटिक्सचा वापर करतो परंतु त्यानं आपल्याला फारसा काही गुण येत नाही. परंतु तुम्हाला माहितीये का की तुम्ही घरच्या घरीही उत्तमप्रकारे आपल्या त्वचेसाठी गुणकारी असलेला एलोवेरा साबण तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टींचीच काळजी घ्यायची आहे. चला तर मग जाणून घेऊया की चांगली त्वचा (Aloevera For Skin) मिळवण्यासाठी तुम्ही नक्की कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करू शकतो? (Aloe Vera soap recipe how to make aloe vera soap at home try this steps )
1. तीन-चार चमचे एलोवेरा जेल तेल
2. एक व्हिटॅमिन ए कॅप्सूल
3. एक तुळशीचं पानं
4. एक सोप बेस बार
सगळ्यात पहिल्यांदा एक छोट्याश्या बाऊल घ्या ज्यात तुम्ही एलोवेरा साबण तयार करू शकता. त्यानंतर त्या बाऊलमध्ये एलोवेरा जेल आणि विटामिन इ हे कॅप्सूल घाला. त्यानंतर ते एकत्र मिसळा. हे मिश्रण संपुर्ण मिक्स होईपर्यंत ते एकत्र मिसळत राहा. जोपर्यंत ते एकत्र होणार नाही तोपर्यंत त्याचा फायदा तुम्हाला पुढे साबण तयार करताना होणार नाही. कारण नाहीतर तुमचा साबण फसण्यासाठी शक्यता आहे. यात नंतर तुळशीची पानं बारिक करून टाका. त्यामध्ये ही पानं नीट मिसळा. त्यानंतर गॅस पेटवा. त्यात हे सोप बेसचे (Soap Base) बारिक तुकडे करून ते तुकडे गरम करण्यासाठी आणि नीट वितळवण्यासाठी ठेवा.
या सोप बेसच्या मिश्रणात तुम्ही तुळशीच्या पानांचे आणि एलोवेरा जेलचे मिश्रण टाकू शकता. त्यानंतर या मिश्रणाला पुर्णपणे चांगल्या तऱ्हेनं मिक्स करा. आणि मग हे मिश्रण एका कंटनेरमध्ये घाला आणि मग ते चांगल्या तऱ्हेनं मिक्स करा. या संपुर्ण एकजीव झालेल्या मिश्रणाला तीन तास तरी फ्रीजमध्ये ठेवा. मग हा पुर्णपणे घट्ट झाल्यानंतर तुमचा साबण तयार करा.
एलोवरो साबणाचे तुमच्या त्वेचेसाठी अनेक फायदे आहेत तुम्हाला याचा फायदा तुमच्या त्वचेसाठी होऊ शकतो. तुमच्या स्किनमध्ये एलोवेरामुळे स्कीनवरील ग्लो वाढतो आणि त्याचसोबतच त्वचा ही मॉईश्चराईज्डही होते.