Ankylosing Spondylitis:कमरेचे किरकोळ दुखणे दुर्लक्षित करू नका

कमरेच्या सतत दुखण्याने कालांतराने एंकायलूजिंग स्पॉन्डिलाइटिस हा आजार बळावला जातो.

Updated: Apr 10, 2019, 05:17 PM IST
Ankylosing Spondylitis:कमरेचे किरकोळ दुखणे दुर्लक्षित करू नका  title=

मुंबई : आजकाल अनेक लोक कमरेच्या दुखण्याने त्रस्त आहेत. अनेकांना समजतच नाही की, कमरेचं हे साधारण दुखणं कधी मोठा आजार होतो. किरकोळ परंतु कमरेच्या सतत दुखण्याने कालांतराने एंकायलूजिंग स्पॉन्डिलाइटिस हा आजार बळावला जातो. एंकायलूजिंग स्पॉन्डिलाइटिस या आजारात पाठीचा कणा मोठा होतो त्यामुळे रूग्णाला अधिक वेळ बसणे मोठे कठीण जाते. चालण्या-फिरण्यासही अशा रूग्णांना त्रास होतो. भारतात १०० लोकांपैकी एक जण एंकायलूजिंग स्पॉन्डिलाइटिसने त्रस्त आहे. अधिकतर २० ते ३० वर्षीय तरूणांना एंकायलूजिंग स्पॉन्डिलाइटिसचा आजार होण्याची शक्यता असते. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात या आजाराचे १० लाख रूग्ण आहेत. एंकायलूजिंग स्पॉन्डिलाइटिसवर औषोधोपचार करूनही रूग्ण हाडाच्या दुखण्याने त्रस्त आहेत. हाडांतील दुखण्यामुळे तसेच सूज आल्यामुळे पाठीचा कणा कठीण होतो. 

चेन्नईच्या डॉ. एम. हेमा यांनी एंकायलूजिंग स्पॉन्डिलाइटिसवर उपचार न घेतल्याने रूग्णांना दररोजची कामं करण्यातही अडथळा येत असल्याचे सांगितले. सततच्या दुखण्यामुळे शरीर संरचनेतही बदल होऊन नुकसान होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एंकायलूजिंग स्पॉन्डिलाइटिस जुना आणि शरीरात कमजोरी आणणारा रोग आहे. 

अनेक कारणांनी रूग्णांना या आजारावर चांगले उपचार करण्यासाठी पर्याय उपलब्ध होत नाही. परंतु बायोलॉजिक थेरेपी करून शरीराच्या संरचनात्मक प्रक्रियेत नुकसान कमी करू शकते. तसेच रूग्णांच्या चालण्या-फिरण्याच्या स्थितीतही सुधारणा केली जाऊ शकते. पाठीचा कणा किरकोळ दुखत असल्याने त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु याच साधारण दुखण्याचे रूपांतर कालांतराने एंकायलूजिंग स्पॉन्डिलाइटिस या आजारात होते. दुर्लक्ष केल्यामुळे आजार जुना होऊन त्यावर उपचार करणे कठीण जाते आणि रूग्णाला दैनंदिन कामं करण्यातही समस्या येतात. त्यामुळे पाठीच्या कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष न करता त्यावेळी वेळीच उपचार करणे फायद्याचे ठरते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x