Earbuds किंवा ब्लुटूथ हेडफोन वापरणाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, होऊ शकतात 'हे' आजार!

Bluetooth harmful to health: एखादी वेबसिरीज, गाणी , पिक्चर,  फोनवर बोलणे यासाठी ब्लू टूथचा वापर आपण करतोच. पण याचा अतिवापर करणं किती धोक्याचे ठरु शकते तुम्हाला माहितीय का?  

श्वेता चव्हाण | Updated: Apr 16, 2024, 03:17 PM IST
Earbuds किंवा ब्लुटूथ हेडफोन वापरणाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, होऊ शकतात 'हे' आजार! title=

Bluetooth side effects on health in Marathi: मोबाईलवर सतत बोलण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी किंवा वेबसिरीज पाहण्यासाठी आपण सतत ब्लू टूथचा वापर करतोच. आजच्या युगात ब्लूटूथ इअरफोन आणि इअरबडचा वापर आता सर्रास केला जातो. अनेकजण ऑफिसमध्ये किंवा प्रवासात असताना दिवसभर ब्लूटूथ इअरफोन वापरतात, पण ब्लूटूथ इअरफोनचा अतिवापर करणे किती धोकादायक आहे? ब्लू-टूथ इअरफोन्सचा सतत वापर केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. ब्लू-टूथ इअरफोन, हेडफोन, इअरबड्सच्या माध्यमातून गाणी ऐकण्याची फॅशन वाढत आहे. तसेच दोन्ही हात मोकळे राहत असल्याने त्यांचा उपयोग फक्त हाक मारण्यासाठी व बोलण्यासाठी केला जातो. 

 ब्लू टूथ वायरलेसचा हा वापर कनेक्टिव्हिटी या सुविधेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दोन डिव्हाईसमध्ये जोडणीसाठी याचा वापर जास्त प्रमाणात होतो. स्मार्टफोन, टीव्ही, होम थिएटर हेडफोन यांसह अनेक उपकरणांसाठी ब्लू टूथचा वापर केला जाऊ शकतो. मात्र याच ब्लू टूथमुळे मोबाईलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी एकाग्र होतात आणि परिणामी कानाचा त्रास, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, स्टॅमिना कमी होणे असे दुष्परिणाम दिसून येतात, असा निष्कर्ष तज्ज्ञ डॉक्टरांनी काढला आहे. तसेच जगात कुठेही असो पण अनेकांकडे वायरलेस इअरफोन असतात. परंतु वायरलेस इअरफोनमधून उत्सर्जित होणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोच्या जेरी फिलिप्स यांनी या विषयावर संशोधन केले असून त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली. 

ब्लू टूथचे रेडिएशन्स आरोग्यासाठी घातक

दिर्घकाळ गाणी ऐकल्याने स्मरणशक्ती कमी होण्याची भीती असते. तसेच वायरलेस हेडफोन्स, इअरफोन्स, इअरबड्स आदींचा जास्त काळ वापर केल्यास त्यामधून बाहेर पडणारी रेडिओ फ्रिक्चेन्सी रेडिएशन्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. तसेत जाणकारांच्या मते, लहान इअरफोन्सल आणि इअरबड्स खूप  धोकादायक असतात.  त्यातून बाहेर पडणारी रेडिएशन्स कान आणि मेंदू अशी दोन्हींना हानी पोहोचवतात. वायरलेस इयरफोनवर गाणी ऐकल्याने किंवा दीर्घकाळ वापरल्याने कर्करोग, न्यूरोलॉजिकल आणि आनुवंशिक विकार, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादीसारखे अनेक धोकादायक आजार होऊ शकतात. वायरलेस हेडफोन्स, इअरफोन्स, इअरबड्स इत्यादी दीर्घकाळ वापरल्यास त्यांच्यापासून निघणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.

ब्लू टूथमुळे 'या'0 आजारांचा धोका अधिक 

  • कर्करोग
  • ल्युकेमिया
  • ब्रेन ट्युमर 
  • अल्झायमर
  • ऑटिझम 
  • त्वचेचे विकार
  • केस गळणे 
  • नैराश्य
  • सतत आजारी पडणे