किचन टॉवेलमुळे होऊ शकते फूड पॉयझनिंग?; आत्ताच जाणून घ्या कारण!

Kitchen Towel Bacteria: किचनमध्ये वापरण्यात आलेल्या टॉवेलमुळं तुमच्या घरात आजार पसरू शकतात. कारण जाणून घ्या 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 4, 2023, 06:05 PM IST
किचन टॉवेलमुळे होऊ शकते फूड पॉयझनिंग?; आत्ताच जाणून घ्या कारण! title=
bacteria is growing on your kitchen towels know the tricks to clean towel

Kitchen Towel Bacteria: किचन हा गृहिणीचा विक पॉइंट असतो. तसंच, आपल्या घरातील मुख्य भाग म्हणजे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरात जेवण बनवलं जात असल्याने गृहिणी किचनच्या स्वच्छतेविषयी अधिक दक्ष असतात. कारण किचनच्या साफ-सफाईकडे थोडं तरी दुर्लक्ष झाले तर फुड पॉयझनिंग किंवा पोटाच्या आजाराचे बळावू शकतात. मात्र, अनेकदा इतकी काळजी घेऊनही घरात सतत आजार वाढलेले असतात. याचं कारण तुमच्या किचनशी संबंधित असू शकते. तुम्ही किचनची साफ-सफाई करत असताना किचन टॉवेलकडे मात्र दुर्लक्ष होते. तुमच्या किचन टॉवेलमुळंही घरात आजार पसरू शकतात. किचन टॉवेलमुळं आजार कसे पसरतात हे जाणून घेऊया... 

किचन टॉवेलमुळं होऊ शकते फूड पॉयझनिंग

किचनमध्ये घाई गडबडीच्या वेळी गृहिणी हमखास किचन टॉवेल वापरतात. मसाल्याचे हात पुसण्यासाठी, भांडी पुसण्यासाठी किंवा गरम भांडे गॅसवरुन उतरवण्यासाठीही किचन टॉवेलचा वापर केला जातो. त्यामुळं किचन टॉवेल गृहिणीच्या सतत हातात वावरत असतो, त्यामुळंच किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या टॉवेलमध्ये बॅक्टेरिया असू शकतात. तुम्ही  किचनमध्ये किती साफ-सफाई ठेवता त्यावरुन तुमचा हँड टॉवेल किंवा किचन टॉवेल किती साफ आहे हे ठरवू शकतो. 

अलीकडेच एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे की, हात पुसण्यासाठी वापरणारा टॉवेल, किचनचा ओटा पुसण्यासाठी वापरणारा कपडा आणि भांडी साफ करण्यासाठी वापरणारा कपडा यांमध्ये बॅक्टेरियाची संख्या अधिक असते. युनिवर्सिटी ऑफ मॉरीशियनच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, किचन टॉवेल ओला असल्याने त्यावर बॅक्टिरियाचा संसर्ग अधिक फैलावत जातो. इतकंच नव्हे तर, नॉनव्हेजचे जेवण बनवल्यानंतर तुम्ही वापरण्यात आलेला किचन टॉवेल योग्य पद्धतीने साफ केला नाही तर इन्फेक्शन होण्याचा अधिक धोका असतो. 

किचनमध्ये असलेला टॉवेल बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतो आणि त्यामुळंच फुड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. धोका अधिक वाढण्यापूर्वी तुम्ही आधीच सावध होण्याची गरज आहे. आम्ही तुम्हाला किचन टॉवेल कसा साफ ठेवावा यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. 

किचनमध्ये असलेल्या टॉवेलची कशी करणार सफाई

किचनमध्ये वापरण्यात येणारा टॉवेल नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवा

प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या टॉवेलचा वापर करा. एकच टॉवेल सगळ्या कामांसाठी वापरु नका

किचनमध्ये असलेला टॉवेल नियमित धुवा तसंच, प्रत्येक महिन्याला टॉवेल बदलण्याचा प्रयत्न करा

टॉवेल ३० सेकंदासाठी मायक्रोव्हेवमध्ये ठेवा. असे केल्याने त्याच्यावर असलेले बॅक्टेरिया मरतात

किचनमध्ये नेहमी कॉटनचा टॉवेल ठेवा, कारण स्वच्छतेच्या दृष्टीने कॉटनचा टॉवेलच योग्य आहे. सिथेंटीक कपडा वापरल्यास त्यामुळं बॅक्टेरिया अधिक फैलावण्यास मदत होते. 

किचनमधील टॉवेलला दर तिसऱ्या दिवशी गरम पाण्यात टाकून ठेवा नंतर साबणाने धवून टाका 

तुम्ही किचन टॉवेलला ब्लीचदेखील करु शकता. तसंच, व्हिनेगरटाकूनही साफ करु शकता.