Belly Fat : सुटलेलं पोट कमी करायचंय? या स्नॅक्सचा विचारंही मनात आणू नका

तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर या 3 स्नॅक्सना तुमच्या आहारातून दूर करा

Updated: Jun 26, 2022, 07:04 AM IST
Belly Fat : सुटलेलं पोट कमी करायचंय? या स्नॅक्सचा विचारंही मनात आणू नका title=

मुंबई : वजन वाढण्याचा विचार केला तर याचे सर्वात मोठं कारण म्हणजे स्नॅक्स. केकचा एखादा घास किंवा काही चिप्स खाणं तुम्हाला हानिकारक वाटत नसेल, परंतु काही काळाने हे तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात. यामुळे तुमचं वजन कमी करणं तर कठीण होईलच पण बेली फॅटही वाढतं. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर या 3 स्नॅक्सना तुमच्या आहारातून दूर करा

बटाटा चिप्स

बटाट्याचे चिप्स सगळ्यांनाच आवडतात. हे चिप्स आपल्याला सतत खावेसे वाटतात. याशिवाय बटाट्याच्या चिप्समध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं, त्यामुळे शरीरात पाणी जमा होऊ लागतं. त्यामुळे तुम्ही बटाटा चिप्स भरपूर खात असाल तर तुमच्या पोटाभोवती चरबी जमा होण्यामागे हेच कारण आहे.

फ्रूट ज्यूस

बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकबंद फ्रूट ज्यूसमुळेही वजन वाढतं. या ज्यूसमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. फळांचा रस भरपूर प्रमाणात पोषक असू शकतो, परंतु त्यात असलेली साखर बेली फॅट वाढवते.

कॉर्नफ्लेक्स

कॉर्नफ्लेक्ससारखा स्नॅक एक सोपा पर्याय असू शकतो, परंतु तो सर्वात आरोग्यदायी नाही. बहुतेक कॉर्नफ्लेक्समध्ये साखर भरपूर असते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार जे लोक नाश्त्यात ओट्स खातात, त्यांचे पोट जास्त काळ भरलेलं राहते, तर जे लोक कॉर्नफ्लेक्स खातात त्यांना लगेच भूक लागते.