अंगावरील सूजला दुर्लक्ष करू नका, हे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

चला तर शरीराला सूज येण्याची कारणे आणि घरगुती उपाय जाणून घेऊ.

Updated: Jun 28, 2022, 04:33 PM IST
अंगावरील सूजला दुर्लक्ष करू नका, हे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात title=

मुंबई : कामाचा तणाव आणि दररोजचं व्यस्तं आयुष्य यामुळे लोकांना स्वत:कडे पाहायला वेळ देखील मिळत नाही. ज्यामुळे लोक गंभीर आजारांना बळी पडतात. जसे- साखर, हृदयविकाराचा झटका, उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, थायरॉईड इ. तसेच यामुळे कधीकधी शरीरात सूज येणे हे शरीराच्या आत एक त्रास होत असल्याचे लक्षण आहे ज्याकडे आपल्यापैकी बहुतेक लोक दुर्लक्ष करतात, जे नंतर सर्वात मोठी चूक असल्याचे सिद्ध होते. याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

खरंतर सूज कोणत्याही वेदना किंवा दुखापतीमुळे देखील असू शकते, परंतु बहुतेकदा हे आरोग्य समस्येमुळे यातात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नये.

त्यामुळे जर तुम्हाला शरीरात असे बदल दिसले तर, विलंब न करता घरगुती उपचार सुरू करावेत. चला तर मग जाणून घेऊया शरीरावर सूज येण्याची कारणे कोणती आहेत आणि कोणते घरगुती उपाय अवलंबावेत.

चला तर शरीराला सूज येण्याची कारणे आणि घरगुती उपाय जाणून घेऊ.

थायरॉक्सिन हार्मोनच्या कमतरतेमुळे देखील शरीरात जळजळ होऊ शकते, ज्याला लोक लठ्ठपणा समजतात. अशा परिस्थितीत शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. याशिवाय हे किडनी आणि यकृत बिघडण्याची चिन्हे आहेत.

हळद आणि दूध हे शरीराची सूज कमी करण्यासाठी खूप जुने आणि प्रभावी उपाय मानले जाते, त्यामुळे घरात कोणाच्या अंगावर सूज आली किंवा दुखापत झाली तरच वडील त्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

जेव्हा तुम्हाला शरीराच्या कोणत्याही भागात सूज दिसून येते, तेव्हा तुम्ही गरम पाण्याने प्रथम उपचार करू शकता. हा सर्वात प्रभावी उपाय आहे. लवकरच तुम्हाला यामुळे आराम मिळू शकेल.

या स्थितीत कांदा आणि हळद हे देखील अतिशय किफायतशीर आणि प्रभावी उपचार आहेत. तुम्हाला फक्त दोन्ही एकत्र करायचे आहे आणि ते सुजलेल्या भागावर लावायचे आहे आणि सुती कापडाने बांधायचे आहे. असे केल्याने सूज हळूहळू कमी होऊ लागते. असे नियमित केल्याने तुम्हाला लवकरच फायदा होईल.

सोबतच मोचला सूज आली असेल आणि दुखापत झाली असेल, तर बर्फ लावल्याने बऱ्यापैकी आराम मिळतो.