break up tips : ब्रेक-अप मधून बाहेर यायच्या जबरदस्त टिप्स... जाणून घ्या

जेव्हा कोणा व्यक्तीचा ब्रेक-अप (break-up) होतो तेव्हा त्याचे दुख हे त्यालाच समजू शकते. 

Updated: Oct 2, 2022, 09:41 PM IST
break up tips : ब्रेक-अप मधून बाहेर यायच्या जबरदस्त टिप्स... जाणून घ्या title=
break up tips Awesome tips to get out of a breakup know nz

break up tips : प्रेमात (love) आपण स्वत:ला विसरतो हे खरंच आहे. जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा आपण नवनवीन अनुभव (Experience) घेत असतो. काहींचे अनुभव चांगले असतात तर काहीजण वाईट अनुभवातून चांगलाच धडा घेतात. पण जेव्हा कोणा व्यक्तीचा ब्रेक-अप (break-up) होतो तेव्हा त्याचे दुख हे त्यालाच समजू शकते. त्या दुखातून सावरताना बऱ्याच सकंटांना सामोरे जावे लागते. त्यातले एक मोठं सकंट असते स्वत:ला सावरणे आणि परिस्थितीतून स्वत:ला बाहेर काढणे. (break up tips Awesome tips to get out of a breakup know nz)

आणखी वाचा -  Astro Tips: गुबगुबित गालाचे पुरुषांचं नशीब... पाहा सामुद्रिक शास्त्र काय सांगते?

मग अशावेळेस आपली मित्र मंडळी किंवा खास लोक आपल्याला वेगवेगळे सल्ले (Advice) देत असतात. अनेकदा योग्य मार्गदर्शनामुळे आपण त्यातून बाहेर पडतो पण काही लोकांच्या बाबतीत विपरीत घडते. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याऐवजी ते क्षण त्यांच्या मनात घर करुन जातात. मग अशावेळेस काही चुका होतात त्या कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा सुधाराव्यात याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

स्वत:ला ब्लेम करणे बंद करा (Stop blaming yourself)
तुमचे ब्रेक अप झाले असल्यास सर्वात आधी स्वत:ला ब्लेम करणे बंद करा. जे काही झालंय ते माझ्यामुळेच झालंय आणि कदाचित माझ्यातच काही कमतरता असेल म्हाणून हे घडलं असावं सगळ्यात आधी असा विचार करणे बंद करा.

कोणत्याही नात्यात दोन्ही व्यक्ती समान सहभागी असतात. सगळ्या गोष्टींसाठी स्वत:ला चुकीचे ठरवणे बंद करा.  टाळी कधीच एका हाताने वाजत नाही आपण वारंवार हे ऐकतो आणि हे तितकंच खरं देखील आहे. जर खरंच तुमच्याकडून रिलेशन मध्ये असताना काही चूक झाली असेल तर ती मान्य करुन पुढे अशी चुक होणार नाही याची काळजी घ्या. 

Black Water : सेलिब्रिटी पीत असलेल्या काळ्या पाण्यामध्ये नक्की असतं तरी काय जाणून घ्या...

नवीन सुरुवात करा (Make a fresh start)

नवीन सुरुवात करा याचा अर्थ दुसऱ्या नात्याची सुरुवात करणे नाही. काही गोल्स सेट करा त्याचा वारंवार फॉलोअप घ्या जमल्यास फोकस रहा. अशाने तुम्ही नवीन सुरुवात कराल. रिलेशनशीपमध्ये (relationship) अपस् आणि डाऊन्स (Ups and downs) येत असतात अशाने खचून न जाता त्यासाठी स्वत: सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)