मुंबई : आपला दात किंवा दाढ दुखू लागला की, आपण म्हणतो आपल्या दाताला किड लागली असावी. परंतु ही खरा कोणताही किड किंवा किडा नसतो, तर हा पाहताना एक काळा डाग किंवा खड्डा दिसतो. ज्यामुळे दात पोकळ होऊ लागतो आणि त्यामुळे कालांतराने दाताचे तुकडे होऊन ते पडू लागतात. तुम्ही जर हा काळा डाग तुमच्या दातामध्ये पाहिलात तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हा डाग शक्य तितक्या लवकर काढला पाहिजे अन्यथा उर्वरित दात देखील खराब करू शकतो.
वास्तविक, जास्त साखर खाल्ल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.
हा जीवाणू प्लेकच्या स्वरूपात देखील दिसून येतो. चला जाणून घेऊया, कोणते घरगुती उपाय आहेत जे काळे डाग काढून टाकण्यास मदत करतात, म्हणजेच दातांचे किडने कमी करु शकतात.
जर तुम्ही या रेसिपीबद्दल आधी ऐकले नसेल, तर आता ऐका. अंड्याच्या शेलमध्ये कॅल्शियम कार्बोनेट असते, जे दातांच्या किडलेल्या इनॅमलला पुन्हा खनिज बनवण्याचे काम करते, ते कुजलेला भाग काढून टाकण्यास देखील उपयुक्त आहे.
त्या सासाठी, अंड्याचे कवच स्वच्छ करा, त्याला उकळवा आणि बारीक करा. आता त्यामध्ये बेकिंग सोडा आणि खोबरेल तेल मिसळा आणि हे मिश्रण टूथपेस्ट म्हणून वापरा.
ही हर्बल पावडर तयार करणे खूप सोपे आहे आणि ते दातांसोबतच हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर उपचार करते. ते बनवण्यासाठी २ चमचे आवळा, एक टीस्पून कडुनिंब, अर्धा चमचा दालचिनी पावडर, बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा लवंग पावडर घालून मिक्स करा. या हर्बल पावडरने दररोज दात घासल्याने तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल.
खोबरेल तेलाचा वापर दातातील किड दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. नारळाच्या तेलाने प्लेक, बॅक्टेरिया, किडणे आणि दातांची दुर्गंधी दूर होते. यासाठी तुम्हाला नारळाच्या तेलाने चुळ भरावी लागेल. परंतु हे खोबरेल तेल गिळू नका. दातांमधील पोकळी काढून टाकण्यासाठी हे सर्वात शक्तिशाली उपायांपैकी एक आहे.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)