नवी दिल्ली : कोरोनापासून लहान बाळांच्या सुरक्षेबाबत नवा शोध आशेचा किरण घेऊन आला आहे. एका अभ्यासात म्हटले आहे की, स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेतल्यानंतर लहान बाळांमध्येही ऍंटीबॉडी मिळाल्या आहेत. परंतु बाळांमध्ये लसीचा कोणताही अंश मिळालेला नाही
या अभ्यासातून समोर आलेला अहवाल जगभरातील स्तनदा मातांसाठी दिलासा देणार आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाने फाइजर आणि मॉडर्नाची लस घेतलेल्या महिलांवर हा अभ्यास केला आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे पेरिनेटोलॉजिस्ट स्टेफनी गॉ म्हणतात की, हा शोध खूपच दिलासा देणारा आहे. सध्या अगदी प्राथमिक स्तरावर असला तरी, त्याचे परिणाम सकारात्मक आहेत.
आता या शोधाचे पुढील उद्देश्य आहे की, ऍंटीबॉडी असलेल्या बाळांचे कोरोनापासून कितपत संरक्षण होऊ शकते.? या अभ्यासाचा निष्कर्ष स्तनदा मातांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करणारा आहे.