मुंबई : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून प्रचंड उकाडा जाणवतोय. अशा दिवसात घामाने शरीर चिकट होऊ नये म्हणून लोकं दोनवेळा अंघोळ करण्यावर भर देतात. तर काही लोकं अशी चूक करतात जी करणं त्यांना महाग पडू शकतं. काही जणं जेवल्यानंतर अंघोळ करण्याची चूक करतात. असं केल्याने असं समस्या समोर येऊ शकतात.
जेवल्यानंतर अंघोळ केल्यास तुमचं वजन वाढू शकतं. शिवाय तुम्हाला एसिडीटीचा त्रास जाणवू शकतो. जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते.
सकाळचा नाश्ता असूदे किंवा रात्रीचं जेवण, तुम्ही जेवल्यानंतर कधीही अंघोळ करू नका. यामुळे अपचनाचा त्रास जाणवतो. अंघोळीनंतर शरीराचं तापमान वाढतं. परिणामी जेवण योग्य पद्धतीने पचत नाही.
अनेकांच्या घरात जेवणानंतर फळं खाण्याची सवय पहायला मिळते. मात्र ही सवय फार चुकीची आहे. असं केल्याने एसिडीटीचा त्रास अधिक जाणवतो.
तुम्हीही पाहिलं असेल अनेकांना खाल्ल्यानंतर स्मोकिंग करण्याची सवय असते. जर तुम्हीही असं करत असाल तर आजच ही सवय सोडून द्या. कारण असं केल्याने तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते.