Heart Attack : सध्या हृद्यासंबंधित समस्या वाढताना पाहायला मिळतात (Increase in Heart Problem). तुम्हाला याबाबत आधीच समजल्यास तुम्हाला संभाव्य हार्ट अटॅकचा धोका टाळता येऊ शकतो(Potential threat of heart attack). पण तुमच्या हृदयातील धमन्यांमध्ये ब्लॉकेज (arteries blockage) आहे की नाही हे कसं समजू शकेल?
काही वर्षांपूर्वी असं बोललं जायचं की साधारणतः वयाच्या 55 वर्षानंतर किंवा साठीशी व्यक्ती आला की हार्ट अटॅक किंवा हृदयासंबंधित समस्या सतावू लागतात. मात्र आता याबाबतचे ठोकताळे संपूर्णपणे बदललेले पाहायला मिळतायत. सध्याचं राहणीमान, आपल्या आहाराच्या सवयी, कामाचं टेंशन यामुळे आपल्या आरोग्यावर आणि खासकरून आपल्या हृदयावर थेट परिणाम होताना पाहायला मिळतो. आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये वयाच्या 30 व्या वर्षी किंवा त्याच्याही आधी हार्टफेल इन्वा हार्ट अटॅक आलेला आपल्याला माहिती असेल. यातील अनेक केसेसमध्ये हृदयातील धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचं खूप उशिरा समजल्याने वेळ निघून गेलेली असते.
मात्र, आपल्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतायत हे आपल्याला आधीच समजलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. कोणते असे संकेत (signs of heart falure) आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतायत हे समजू शकेल? यासाठी सर्वात आधी जाणून घेऊयात धमन्यांमधील ब्लॉकेज नेमकं असतं तरी काय?
जेंव्हा हृदयात रक्तप्रवाह पोहोचत नाही, हृदयापर्यंत ऑक्सिजन पोहचत नाही तेंव्हा तुमच्या धमन्या ब्लॉक झाल्यात किंवा कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज (Coronary Artery Disease) असल्याचं बोलू शकतो. तुमच्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठल्याने धमन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात.
तुमच्या धमन्यांमध्ये जखम होण्यापासून याची सुरुवात होते. तुमच्या शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स, तुमची धूम्रपानाची सवय, उच्च कोलेस्ट्रॉल, हाय ब्लडप्रेशर किंवा तुमच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे तुम्हला आर्टरीज ब्लॉकेज होऊ शकतात.
तुमची फास्ट लाईफस्टाईल असेल तर तुम्हाला ब्लॉकेजचा जास्त धोका आहे. अगदी लहानपणापासून धमन्यांमधील ब्लॉकेज तयार होऊ शकतात. यासोबतच जाड्यत्व, हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनाही याचा जास्त धोका आहे.
धूम्रपान बंद करा
दररोज व्यायाम करा
हेल्थी अन्नपदार्थ खा
हाय कोलेस्ट्रॉल असणारे अन्नपदार्थ खाणं टाळा