close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'या' पाच प्रकारच्या बियांच्या सेवनाचे अनेक फायदे

या बियांनाही तितकंच महत्त्व दिलं जाणं गरजेचं आहे. कारण.... 

Updated: Oct 17, 2019, 08:46 PM IST
'या' पाच प्रकारच्या बियांच्या सेवनाचे अनेक फायदे

मुंबई : आहाराच्या विविध सवयी आणि त्यांचे फायदे अनेकदा दुर्लक्षित राहतात. नकळतपे आपण बहुविध कारणांनी तेलबिया किंवा इतर अनेक प्रकारच्या बियांचं सेवन करत असतो. कित्येकदा तर, त्यांचा फायदाही लक्षात येत नाही. 

खरतंर, भाज्या, प्रथिनं युक्त आहार या साऱ्याचं सेवन करण्यावर भर दिला जात असतानाच या बियांनाही तितकंच महत्त्व दिलं जाणं गरजेचं आहे. कारण, शरीराला गरजेचं असणारं लोह, स्निग्ध घटक, व्हिटॅमीन आणि अनेक तत्व ही याच इवल्याश्या बियांच्या सेवनाद्वारे शरीराला पुरवली जातात. शरीरार उपयुक्त ठरणाऱ्या अशाच बियांचे प्रकार खालीलप्रमाणे... 

सब्जा - ओमेगा ३चं प्रमाण जास्त असल्यामुळे सब्जाचं सेवन केलं जातं. अभ्यासपूर्ण निरिक्षमातून सिद्ध झाल्यानुसार सब्जाच्या सेवनाने रक्तातील साखरेचं असंतुलित प्रमाण नियंत्रणात राहतं, हे प्रमाण जास्त असल्यास ते कमी करण्यातही सब्जा उपयोगाचा ठरतो. पाण्यात भिजवून सॅलडमधून त्याचं सेवन करण्याचाही सल्ला देण्यात येतो. 

तीळ- आशियाई देशांमध्ये तीळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नैराश्य, ताणतणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सना कमी करण्यात तीळ उपयुक्त ठरतात. शरीराला आवश्यक असणाऱ्या स्निग्धतेचा पुरवठा करणारे हेच तीळ शरीरास घातक असणारं कोलेस्ट्रॉल घटवण्यात मदतीचे ठरतात. 

सूर्यफुलाच्या बिया- हृदयरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुर्यफूलाच्या बिया फायद्याच्या ठरतात. ओमेगा ६ चं प्रमाण या बियांमध्ये असल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही त्यांची मदत होते. 

भोपळ्याच्या बिया- भोपळ्याच्या बियांचंही अनेक घरांमध्ये सर्रास सेवन केलं जातं. बंगाल आणि बिहारमध्ये या बिया राईच्या तेला तळून खाल्ल्या जातात. हृदय, नसा आणि हाडांसाठी त्या फायद्याच्या ठरतात. 

अळशीच्या बिया- रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अळशीच्या बियांचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. कर्करोगाचा धोकाही या बियांच्या सेवनाने कमी होतो असं म्हटलं जातं.