भाऊबीजच्या दिवशी फॉलो करा या टीप्स, नात्यात आणखी वाढेल गोडवा

भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा वाढवण्याचे हे उपाय आहेत. 

Updated: Oct 23, 2022, 11:18 PM IST
भाऊबीजच्या दिवशी फॉलो करा या टीप्स, नात्यात आणखी वाढेल गोडवा title=
Follow these tips on brotherhood day the relationship will be sweeter nz

Bhai Dooj 2022: ऑक्टोंबर महिन्याला सणांचा महिना म्हटले जाते. या महिन्यात नवरात्र, दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण येतात. त्यातच भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात भारतात साजरा केला जातो. दरवर्षी दिवाळीच्या दोन दिवसांनी भाऊबीज येते. यावर्षी 26 ऑक्टोबर 2022 रोजी  भाऊबीज आहे. भाऊबीज हा सण बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा सण आहे. भाऊ आणि बहीण हे एकमेकांचे पहिले मित्र आहेत. ते अनेकदा भांडत असले तरी कठीण प्रसंगी एकमेकांसोबत असतात. अनेकदा या नात्यात भांडणं पाहायला मिळतात तर काहींदा तितकाच समजूतदारपणा देखील पाहायला मिळतो.

पण कधी कधी अनेक मतभेद, वारंवार होणारी भांडणे, नोकरी किंवा लग्न, एकमेकांना वेळ न द्यायला यांमुळे लहानपणी भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा राहत नाही. अशा वेळी भाऊ-बहिणीचे नाते सदैव घट्ट आणि स्नेहाचे बनवण्याचे काही उपाय आहेत, ज्याचा प्रत्येकाने अवलंब केला पाहिजे. भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा वाढवण्याचे हे उपाय आहेत. (Follow these tips on brotherhood day the relationship will be sweeter nz)

आणखी वाचा - Clean Gold Silver jewellery : जुन्या सोन्याच्या दागिन्यांना येईल झळाली, 'ही' गोष्ट करून पाहा

 

आपुलकीचा आनंद साजरा करा

नातं अधिक घट्ट आणि आपुलकीचं होण्यासाठी एकमेकांचे छोटे-मोठे आनंद साजरे करा. जर भावंड एकमेकांपासून दूर असतील तर व्हिडिओ कॉलद्वारे किंवा ऑनलाइन भेटवस्तू पाठवून तुम्ही नाते विशेष बनवू शकता.

हे ही वाचा - दुधाची साय चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला 'हे' फायदे होतील, जाणून घ्या 

बालपणीच्या आठवणी उजाळा द्या

अनेकदा भावंडांमधील बंध, जो लहानपणी असतो, तितका स्नेह आणि बंध वयाबरोबर राहत नाही. यामागील एक कारण म्हणजे तुमची व्यस्तता किंवा तुमच्या वागण्यात बदल आणि वयानुसार प्राधान्यक्रम असू शकतात. अशा वेळी भाऊ-बहिणींनी वेळोवेळी एकत्र बसून त्या जुन्या आठवणी, त्या गोष्टी ताज्या कराव्यात. बालपणीच्या आठवणी नात्यातील जुने स्नेह विरघळू शकतात.

साथ द्या

भाऊ-बहिणीने प्रत्येक सुख-दु:खात एकमेकांना साथ दिली पाहिजे. बहीण आणि भावाला एकमेकांना मदत करण्याचा अधिकार आहे. मदत केल्याने नातं अधिक घठ्ठ व्हायला मदत होते.

हे ही वाचा - रोज सकाळी 'ही' पानं उकळून प्या, 'हे' होतील फायदे

संभाषण आवश्यक आहे

प्रत्येक भावंडांनी एकमेकांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि त्यांच्या करिअरमुळे भावंड एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. बरेच दिवस त्यांच्यात बोलणे झाले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यात अंतर येऊ लागते. दूर असाल तर आठवड्यातून एक-दोनदा फोन करून नात्यातील गोडवा टिकवून ठेवता येतो.

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)