सततच्या खोकल्यापासून होईल सुटका, 10 रुपयांचे हे फळ आहे रामबाण, मधुमेहही येईल नियंत्रणात

Guava Health Benefits: हिवाळ्याच्या दिवसांत सतत सर्दी-खोकला होतो. अशावेळी डॉक्टरांची औषधे घेण्यापेक्षा या फळाचे सेवन करा.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 28, 2023, 03:17 PM IST
सततच्या खोकल्यापासून होईल सुटका, 10 रुपयांचे हे फळ आहे रामबाण, मधुमेहही येईल नियंत्रणात title=
Guava fruit is best treatment for cough and cold diabetes patients tips in marathi

Health Benefits of Guava: आजारांना दूर ठेवण्यासाठी मौसमी फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. थंडीच्या दिवसांत संत्र व पेरू मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. तर, संत्री आंबट गोड असतात तर पेरू गोड असतो. हिवाळ्यात ताप, सर्दी- खोकला यांचे प्रमाण वाढते. थंडी असल्याने कोरडा खोकलादेखील खूप वाढतो. पण या दिवसांत  पेरू खाणे खूप फायद्याचे आहे. पेरूमध्ये अनेक पोषकतत्वे असतात त्यामुळं थंडीच्या दिवसांत पेरुचे सेवन आवश्यक करावे. हिवाळ्यात पेरु खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. व्हिटॅमिन-सी आणि फायबरने युक्त असलेल्या पेरूमुळं अनेक आजारांचा धोका कमी होतो. 

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात पेरू खाणे खूप फायद्याचे आहे. यात व्हिटॅमिनची मात्रा भरपुर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. पेरूवर काळे मीठ टाकून खाल्ल्यास शरीरासाठी अधिक लाभकारी ठरते. पेरुमुळे मधुमेहही नियंत्रणात राहतो आणि मधुमेहाचे रुग्णही याचे सेवन करु शकतात. पेरुचे सेवन तुम्ही दिवसभरात कधीही करु शकता. पण शक्यतो रात्रीच्या दिवसात फळांचे सेवन करु नये असा सल्ला दिला जातो. 

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सर्दी-खोकल्यामुळं हैराण असलेल्या लोकांसाठी पेरू रामबाण ठरु शकतो. सतत फक्त पेरू खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर सुरुवातीला पेरू गॅसवर चांगल्या पद्धतीने भाजून घ्या नंतर तो स्मॅश करुन त्यात काळे मीठ टाकून सेवन करावे. असे केल्याने खोकल्यापासून लवकर आराम मिळतो. पिकलेल्या पेरुमध्ये काळे मीठ टाकून खाणे औषधाप्रमाणे काम करते आणि खोकल्यापासून लगेचच आराम मिळतो. जर तुम्हाला सतत सर्दी-खोकल्याचा त्रास असतो त्यांनी पेरू शिजवून खावा त्यामुळं शरीराला अनेक फायदे मिळतात. 

पेरूचे अन्य फायदे

पेरु खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. कारण यात फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट स्वच्छ होते. पेरू पोटासाठीही खूप चांगला मानला जातो. अनेक संशोधनात समोर आलं आहे की, पेरू हृदयाच्या आरोग्यासाठीही वरदान आहे. पेरुत पोटॅशियम आणि सोडियमची चांगली मात्रा आहे. ज्यामुळं हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. पेरु खाल्ल्याने हाय कोलेस्ट्रॉलदेखील कमी होते. ज्यामुळं हृदय निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका टळतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)