High cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर तुमच्या त्वचेवर होतात 'हे' 3 बदल!

तुम्हाला माहितीये का कोलेस्ट्ऱॉल (High cholesterol) वाढण्याचे संकेत तुमच्या त्वचेवरही (skin) दिसून येतात.

Updated: Nov 9, 2022, 06:23 PM IST
High cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर तुमच्या त्वचेवर होतात 'हे' 3 बदल! title=

High cholesterol : सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे (Lifystyle) लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडत आहेत आणि यामुळे लोक सतत नवीन आजारांना बळी पडत आहेत. सतत खाण्या-पिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब  (High Blood Pressure)आणि हृदयविकाराचा धोका तर वाढतोच, शिवाय शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे (bad cholesterol) प्रमाणही वाढते. त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. मात्र तुम्हाला माहितीये का कोलेस्ट्ऱॉल (High cholesterol) वाढण्याचे संकेत तुमच्या त्वचेवरही (skin) दिसून येतात.

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात असलेल्या धमन्या ब्लॉक होतात. ज्यामुळे तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो. हाय कोलेस्ट्रॉलची समस्येमुळे संबंधित व्यक्तीला हृदयाचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल वाढण्याचे त्वचेवर कोणती लक्षणं दिसून येतात.

सोरायसिस

हाय कोलेस्ट्रॉल लेवल वाढली की सोरायसिसची समस्या वाढू लागते. याला वैद्यकीय भाषेत हायपरलिपिडियमा असं म्हटलं जातं. या समस्येमध्ये रक्तात लिपिड वाढतं. ज्यामुळे शरीराची त्वचा कोरडी पडून खाज सुटते. यावेळ अनेकदा त्वचेतून रक्तस्रावही होतं.

त्वचेचा रंग बदलणं

ज्यावेळी शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तेव्हा त्वचेच्या खालील बाजूस रक्तप्रवाह कमी होऊ लागतो. यामुळे त्वचेच्या कोषिकांना पोषण मिळत नाही आणि त्वचेचा रंग बदलतो. याशिवाय हाय कोलेस्ट्रॉल वाढल्याने चेहऱ्याचा रंग हल्का काळा होऊ लागतो. 

डोळ्यांजवळचा त्वचेचा रंग बदलतो

शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढली की, डोळ्यांखालील त्वचेचा रंगही बदलण्यास सुरुवात होतो. हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या रूग्णांच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात हल्का केशरी आणि पिवळा रंगाचा थर जमा असल्याचं दिसतं. वैद्यकीय भाषेत याला जॅंथेलमा असं म्हटलं जातं. त्वचेच्या खाली कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने हे बदल दिसून येतात.