सॅनिटरी पॅडचा वापर करणं कितपत सुरक्षित?

सॅनिटरी पॅडचा चुकीच्या वापराने इन्फेक्शनचा धोका वाढण्याची शक्यता असते.

Updated: Feb 11, 2022, 03:03 PM IST
सॅनिटरी पॅडचा वापर करणं कितपत सुरक्षित? title=

मुंबई : पिडीयड्स दरम्यान अधिक महिला सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात. बाजारात विविध प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध असतात. यामध्ये आकारात वेगळेपण तसंच सुगंधित सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर केला जातो. मात्र यांचा वापर करणं सुरक्षित आहे का? मात्र यांचा सततचा वापर आणि स्वच्छतेच्या बाबतीत काळजी न घेतल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो.

सॅनिटरी पॅडचा चुकीच्या वापराने इन्फेक्शनचा धोका वाढण्याची शक्यता असते. पॅडच्या केमिकलमुळे एलर्जी, उष्णता आणि आर्द्रतेमुळे होणारा त्रास ही काही लक्षणं आहेत.

फ्रिक्शन (Friction)

सेंटर फॉर यंग विमेन हेल्थच्या मताप्रमाणे, चालणं, धावणं किंवा इतर शारीरिक हालचालीमुळे घर्षण होतं. या घर्षणामुळे योनिमार्गाजवळ इन्फेक्शन होऊ शकतं.

कॉन्टॅक्ट डर्मेटाइटिस

सॅनिटरी पॅडमध्ये असलेले केमिकल्स योनीमार्गाच्या संपर्कात आल्यावर इन्फेक्शनचं कारण बनू शकतात. पॅडमध्ये अनेक गोष्टी असतात ज्यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते. 

उष्णता आणि आर्द्रता

सॅनिटरी पॅडमधील ओलावा आणि उष्णता योनीला त्रास देऊ शकतात. शिवाय यामुळे पिगमेंटेशन म्हणजेच पुरळ उठण्याची समस्या उद्भवू शकते.

पॅड उशीराने बदलणं

मासिक पाळी दरम्यान नियमित वेळेत पॅड बदलणं खूप महत्त्वाचं आहे. जर पॅड वेळीत बदललं नाही तर योनीच्या सतत संपर्कात आल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो. मासिक पाळी दरम्यान दर 3-4 तासांनी पॅड बदललं पाहिजे.