मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणे स्वाभाविक आहे. सतत घाम येण्याच्या समस्येमुळे डीहायड्रेशनचा त्रास वाढतो सोबत अनेकांमध्ये केसगळतीचा धोका बळावण्याचा धोकाही अधिक असतो. अशावेळेस काही चूका टाळल्यास उन्हाळ्याच्या दिवसात होणारी केसगळतीची समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.
घामामध्ये लॅक्टिक अॅसिड अधिक असते. केसांच्या आरोग्यासाठी अल्प स्वरूपातील लॅक्टिक अॅसिड फायदेशीर ठरते परंतू अधिक प्रमाणात केसांना, टाळूवर लॅक्टिक अॅसिड लावल्यास टाळूवरील छिद्र आकसतात. त्यांचा आकार लहान होतो. यामुळे कमजोर होऊन ते तुटतात.घाम अधिक प्रमाणात आल्यास टाळूवर खाज, सूज येण्याचे प्रमाण वाढते. लॅक्टिक अॅसिडमुळे केसाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे केरोटिन तत्त्व नष्ट होतात. यामुळे नवे केस निर्माण होत नाहीत.
घामामुळे उन्हाळ्याच्या दिवसात केसांचे अधिक प्रमाणात नुकसान होते. आठवड्यातून 2-3 वेळेस केस धूत असल्यास माईल्ड शाम्पूचा वापर करा. कडक उन्हात बाहेर फिरायला जाणार असाल तर केस कापडाने बांधण्यापेक्षा छत्रीचा वापर करा म्हणजे केसांना, टाळूवरील छिद्रांना पुरेसा श्वास घेण्यास जागा मोकळी राहील सोबतच घाम कमी येईल.
केसांना मजबूत करण्यासाठी आठवड्यातूम किमान 2 वेळेस मूळासकट तेलाचा मसाज करा. याकरिता आवळा, बदाम, ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करा. केस विरळ होणं, कोंडा, दुतोंडी केस या समस्या कमी होण्यास मदत होते.
साल नसलेल्या उडदाच्या डाळीला उकळून त्याची पेस्ट करा. रात्री झोपण्यापूर्वी केसांना उडदाच्या डाळीच्या पेस्टचा लेप लावा. यामुळे डोकं थंड राहणयस मदत होते. घाम येण्याचा त्रासही आटोक्यात राहतो. केसांचं आरोग्य जपण्यासाठी उडदीच्या डाळीची पेस्ट फायदेशीर ठरते.
अनेकांना असं वाटते की सतत केस विंचरण्याच्या सवयीमुळे केस लांब वाढण्यास मदत होते. केस गुंतू नयेत याकरिता दिवसातून 2-3 वेळेस केस विंचरणं पुरेसे आहे.