मुंबई : अयोग्य जीवनशैलीमुळे चुकीच्या आहाराची आपल्याला सवय लागते. अशावेळी आपण असे अनेक पदार्थ खातो, ज्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, अनेक शारीरिक समस्या मागे लागतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे.
मात्र शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढलंय हे आपल्याला कळणार कसं? तुम्हाला माहितीये का, कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमचं शरीर तुम्हाला संकेत देतं. महत्त्वाचं म्हणजे, हे संकेत ओळखणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणं दिसून येतात.
कोलेस्ट्रॉलची स्तर वाढल्यानंतर पायांमध्ये वेदना जाणवू लागतात. याचं कारण म्हणजे धमन्यांमध्ये फॅट जमा होतं. या फॅटमुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. परिणामी हातांमध्ये वेदना जाणवतात.
शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्यानंतर हृदयाचं आरोग्यंही बिघडतं. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास वाढतो. यामुळे स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. त्रास जास्त वाढल्यास डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.
जर तुमच्या त्वचेचा रंग बदलू लागला असेल तर थोडं सावध व्हा. कारण हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचं लक्षण मानलं जातं.
कोलेस्ट्रॉलची वाढ झाल्यावर डोळ्यांमध्येही लक्षणं दिसून येतात. अशा परिस्थितीत कॉर्नियाच्या बाहेरील बाजूचा आकार पांढरा किंवा हलक्या निळ्या रंगाचा दिसण्याची शक्यता आहे. असं दिसून आल्यास तातडीने कोलेस्ट्रॉलची चाचणी करून पाहावी.