वॅक्सिन घेतलंस तर ब्रेकअप करेन...बॉयफ्रेंडची अजब धमकी

एका तरूणाने त्याच्या गर्लफ्रेंडला लसीच्या बाबतीत एक विचित्र धमकी दिली. 

Updated: Sep 16, 2021, 12:57 PM IST
वॅक्सिन घेतलंस तर ब्रेकअप करेन...बॉयफ्रेंडची अजब धमकी

ब्रिटन : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लस फार गरजेची आहे. मात्र ब्रिटनमध्ये एका तरूणाने त्याच्या गर्लफ्रेंडला लसीच्या बाबतीत एक विचित्र धमकी दिली. लस घेतली तर ब्रेकअप करेन अशी विचित्र धमकी या तरूणाने गर्लफ्रेंडला दिली. 

'मिरर यूके' मधील एका रिपोर्टनुसार, मुलीने तिच्या बॉयफ्रेंडची ही कहाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. तिने सांगितलं की, ती आणि तिचा बॉयफ्रेंड एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मला कोरोना लसीचा पहिला डोस खूप पूर्वी मिळाला होता. पण जेव्हा दुसरा डोस घेण्याची वेळ आली तेव्हा त्याने विचित्र धमक्या देण्यास सुरुवात केली.

मुलीने सांगितले की, बॉयफ्रेंडने मला दुसरा डोस घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. एवढंच नाही तर त्याने सांगितलं की, जर मी लस घेतली तर तो मला सोडून देईल. म्हणजेच ब्रेकअप करेल. पहिल्यांदा मुलीला ही सर्व मस्करी वाटली. परंतु नंतर तिला असं समजलं की तो याबाबत गंभीर आहे.

अशा परिस्थितीत मुलीला काळजी वाटली की, जर तिने लसीकरण करवून घेतलं नाही तर ती तिचा अभ्यास चुकवेल आणि जर तिने लसीकरण पूर्ण केलं तर तिचं नातं तुटू शकतं. या प्रकरणाबाबत तिने सोशल मीडियावर लोकांकडून मत मागवली.

काही युजर्स म्हणतात की, मुलीने लस घ्यावी, याबाबत तिच्या बॉयफ्रेंडची काळजी करू नये. त्याचवेळी एका युजरने सांगितलं की तिने बॉयफ्रेंडसाठी तिच्या जीवाशी खेळू नये. तर तिने तिच्या प्रियकराला यासाठी राजी करावे आणि लस किती महत्त्वाची आहे हे त्याला समजावून द्यावं, असंही एकाने म्हटलंय.