मुंबई : पुरुष असो वा महिला आपल्या नेहमीच समोरच्यामध्या काही ना काही गोष्टी कमी असल्याचे जाणवते किंवा समोरच्याच्या काही सवयी आवडत नाही. ज्यामुळे आपण एकतर त्या व्यक्तीपासून लांब जातो किंवा समोरच्या व्यक्तीला त्या बदलायला लावतो. प्रत्येक कपलमध्ये देखील असेच काहीसे असते. ते एकमेकांवर कितीही प्रेम करत असले तरी, प्रत्येक व्य़क्तीला आपल्या जोडीदारामधील काही ना काही गोष्ट खटकते. ज्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागताता.
आज आम्ही तुम्हाला अशा मुलांच्या सवयीबद्दल सांगणार आहोत, ज्या मुलींना बिलकूल आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला देखील या सवयी असतील तर आताच बदला नाहीतर तुम्हाला तुमचा जोडीदार या कारणामुळे तुम्हाला सोडून जाऊ शकतो.
मुलींना स्वत:ची स्तुती करणारे पुरुष बिलकूल आवडत नाहीत. अशा पुरूषांना केवळ आपल्याबद्दल बोलले आवडते आणि ते समोरच्याला बोलायला देत नाहीत अशी मुलं मुलींना कधीही आवडत नाही.
ज्या पुरुषांना प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हाव्यात असे वाटत असते आणि त्यामुळे ते समोरील व्यक्तीला कंट्रेल करु लागतात अशा प्रकाचे पुरूष मुलींना अजिबात आवडत नाही. तो बरोबर आहे आणि समोरचा चूकीचा असे म्हणणारे लोकं देखील मुलींना आवडत नाही कारण ते मुलींना स्वत:ची स्पेस देत नाही.
प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये नाटकं करणारी, कारणं सांगणारी मुलं मुलींना आवडत नाही. ज्यामुलांना समोरील व्यक्तीकडून सारखी सहानभूती हवी असते आणि जे मुलं रिलेशनशिपमध्ये स्वत:ला एकदम खास असल्या सारखे दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा मुलं मुलींना आवडत नाही. मुली अशा पुरूषांपासून लांबच राहतात.
खरेतर मुलं कधीच दुसऱ्या लोकांच्या गोष्टीत पडत नाहीत. आपण बरं आणि आपलं काम बरं असं म्हणणारे मुलं मुलींना आवडतात. परंतु जी मुलं दुसऱ्यांबद्दल बोलताता, लोकांच्या पर्सनल गोष्टींबद्दल कमेंट करतात. अशी मुलं कोणत्याही मुलीला आवडत नाही. एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरं सांगून आग लावणारे मुलं देखील मुलींना आवडत नाहीत. त्यामुळे असं जर तुम्ही करत असाल तर आताच थांबवा.
पुरूष आपली एक चूकी लपवण्यासाठी एका मागोमाग खोटं बोलत असतात, जे मुलींना बिलकूल आवडत नाही. अशी लोकं नातं टिकवून देखील ठेवत नाहीत, त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवता येत नाही आशा मुलांपासून मुली चार हात लांब राहतात.
मुलींना स्वत:चे कौतुक करुन घ्यायला फार आवडते, त्यामुळे जर एखाद्या मुलानं मुलीचं कौतुक केलं नाही, तर मुलींना ते आवडत नाही. तसेच मुलींना त्यांना प्रोत्साहित करणारा मुलगा आवडतो, जो तिला प्रत्येक गोष्टीत मदत करेल आणि तिची साथ देईल. परंतु जर पुरूष हे करत नसेल तर मुलीं अशा मुलांपासून लांब राहतात.