केस खूप गळतात, वजनही वाढलंय; मग ही सिक्रेट रेसिपी करुन पाहाच!

Kadi Patta Chutney For Weight Loss: कडिपत्ता आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. कडिपत्त्याच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 19, 2023, 06:02 PM IST
केस खूप गळतात, वजनही वाढलंय; मग ही सिक्रेट रेसिपी करुन पाहाच! title=
kadi patta for weight loss and hair growth how to make chutney recipe in marathi

Kadi Patta Chutney For Weight Loss: केस गळताहेत, केस कमकुवत झालेत, केस पांढरे व्हायला लागलेत, अशा अनेक समस्या हल्ली कानावर येतात. प्रदूषण आणि असंतुलित आहार याचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर आणि केसांवरही होतो. घनदाट लांब केस आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी केसांना वेगवेगळी तेल, सिरम किंवा हेअर मास्क लावतात. तसंच, त्वचेसाठीही वेगवेगळे उपाय केले जातात. मात्र, केसांच्या व त्वचेच्या आरोग्यासाठी काही पदार्थहे पोटातून जाणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप यामुळं केस गळतीतर थांबतेच व केसांची वाढही चांगली होते. पण आज आम्ही तुम्हाला एक सिक्रेट रेसिपी सांगणार आहोत. यामुलं केसगळतीबरोबरच वजन कमी करण्यासही प्रभावी आहे. 

कडिपत्त्याचे फायदे

कडिपत्ता आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कडिपत्ता शरीरात डिटॉक्सिफाईंग तत्वाप्रमाणे काम करते. त्यामुळं कडिपत्तामुळं वजनदेखील कमी होते. कडिपत्त्यात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरीयल, अँटी-फंगल गुण आहेत. त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून बचाव होतो. कडिपत्ता आयरन आणि फॉलिक अॅसिडचा स्रोत आहे.

केसांसाठी गुणकारी

कडिपत्त्यामध्ये लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसंच आयोडिनचं भरपूर प्रमाण आहे. त्यामुळे गळणाऱ्या केसांसाठी कडिपत्ता गुणकारी आहे. कडिपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. ब्लडमधील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगर लेवल कमी करते. नियमित कडिपत्त्याचे सेवन केल्यास पाचनशक्ती वाढते तसंच, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कडिपत्त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी होते.

कडिपत्त्यांच्या रसामध्ये व्हिटॅमिन एचे प्रमाण आढळते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ए जीवनसत्व चांगले असते. त्यामुळं डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी ते मोतिबिंदूसारख्या आजारांपासून तुम्ही दुर राहता. कडिपत्ताचा रस प्यायल्याने शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण होते. हिमोग्लोबिन वाढते. 

कडिपत्त्याची चटणी कशी करावी

सर्व प्रथम एका भांड्यात थोडेसे तेल घालावे. तेल थोडे गरम झाल्यानंतर त्यात तमालपत्र, शेंगदाणे, चणा डाळ, उडीद डाळ, डाळी, धणे, दोन ते तीन लाल मिरच्या, जिरे आणि सगळ्यात शेवटी 1 कप कडिपत्ता टाकून सर्व मिश्रण एकजीव करुन घ्यावे. 

10 मिनिटे हे सर्व मिश्रण भाजून घ्या. व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करुन घ्या. त्यानंतर हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सर्व जिन्नस घ्या आणि त्यात एक एक टेबलस्पून मीठ, साखर आणि हळद टाकून चटणी वाटून घ्या. 

कडिपत्त्याची ही चटणी दोन ते तीन महिने आरामात टिकते. फक्त चटणी एअर टाइट डब्ब्यात ठेवून द्या. जेवताना किंवा चपातीसोबत तुम्ही चटणी खावू शकता. नियमित या चटणीचे सेवन केल्यास केसगळतीबरोबर वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.