Heart Attack : पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर, अशा प्रकारे प्रकारे घ्या काळजी

हृदयविकारातून माणूस बरा झाला, त्याच्यावर योग्य तो उपचार झाले असले, तरीही अशा काही गोष्टी आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 

Updated: Aug 11, 2022, 07:35 PM IST
Heart Attack : पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर, अशा प्रकारे प्रकारे घ्या काळजी title=

मुंबई : सध्याच्या व्यस्त आणि पळापळीच्या जिवनशैलीत लोक आपल्या आरोग्याकडे पाहात नाहीत, ज्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत आहे. त्यांपैकीच एक आहे ते म्हणजे हृदयविकाराचा झटका. जो खूपच गंभीर आहे. तरुणांपासून ते अगदी म्हाताऱ्यांपर्यंत बरेच लोक या समस्येला बळी पडले आहेत.  एवढंच काय तर मोठ-मोठे सेलिब्रिटी देखील त्यापासून वाचू शकले नाही.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे, तर लाफ्टर किंग राजू श्रीवास्तवला (Raju Srivastava)  हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच असे बरेच सर्वसामान्य लोक असतील ज्यांना हृदयविकाराच्या झटका येऊन गेला असावा. परंतु असे असले तरी त्याकडे दुर्लक्ष करुन चालनार नाही.

हृदयविकारातून माणूस बरा झाला, त्याच्यावर योग्य तो उपचार झाले असले, तरीही अशा काही गोष्टी आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 

अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर तुम्ही स्वतःची काळजी कशी घ्यावी? चला जाणून घेऊया.

 हृदयविकाराचा पहिला झटका आल्यानंतर अशा प्रकारे स्वतःची काळजी घ्या

सोडियमपासून लांब राहा

ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, त्यांनी जास्त प्रमाणात मीठ सेवन करणं टाळा. निरोगी व्यक्तींनीही मीठाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. दुसरीकडे, ज्या व्यक्तीला आधीच हृदयविकाराचा झटका आला असेल, तर त्यांच्या आहारातील सोडियमचे प्रमाण कमी करा.

शारीरिक क्रियाकलाप जोडा

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सारखं सारखं विश्रांती घेणं देखील तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. असे केल्याने तुम्हाला इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या शारीरिक हालचालींकडे लक्ष दिलं पाहिजे. अशावेळी व्यायाम करणं केव्हाही चांगलं. तसेच चालणे, सायकल चालवणे इत्यादी गोष्टी देखील तुम्ही करू शकता.

कामात व्यस्त

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कामावर परत जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा, जसे की कामावर गेल्यावर तुम्हाला कामाचा तणाव येणार, परंतु याकडे दुर्लक्ष करा, जास्त ताण घेऊ नका. यासाठी तुम्ही तुमच्या कामाची पद्धत बदला.

गोड पदार्थ खाऊ नका

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चॉकलेट, साखर, पेस्ट्री, मिठाई यासारख्या गोष्टी तुमच्या आहारातून बाहेर असाव्यात. त्यांचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. तसेच या सर्वांचे अति प्रमाणात सेवन केल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)