फ्रीजमध्ये ठेवूनही कणकेचा गोळा काळा पडतोय? वापरा या साध्या टिप्स

Kitchen Hacks In Marathi: मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवत आहात ते पीठ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 6, 2023, 07:11 PM IST
फ्रीजमध्ये ठेवूनही कणकेचा गोळा काळा पडतोय? वापरा या साध्या टिप्स title=
Kitchen Hacks How to Keep Dough for long for softs fluffy chapati cooking tips in marathi

Cooking Tips In Marathi: रोजच्या जेवणात किंवा ऑफिसच्या डब्यासाठी गव्हाच्या चपात्या केल्या जातात. काही जणांना चपात्यांशिवाय जेवण अपूर्ण असल्यासारखे वाटते. सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत चपात्या करण्यासाठी घाई होते. अशावेळी गृहिणी आधीच चपात्यांचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र, कधीकधी चपात्यांचे पीठ काळे पडते. या पीठाच्या चपात्याही चवीला चांगल्या लागत नाही. तसंच, दुसऱ्या दिवशी या पीठाच्या चपात्याही कडक होतात. कणीक मळताना काय काळजी घ्यावी व  मळलेले पीठ काळे पडू नये यासाठी यासाठी आम्ही तुम्हाला काही साध्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरल्यास तुमच्या चपात्या मऊसूत आणि फुगलेल्या होतील. 

अनेक महिला सकाळच्या स्वयंपाकाची तयारी रात्रीच करुन ठेवतात. कणिकही रात्रीच भिजवून ठेवतात. मात्र कणिक किती काळ फ्रीजमध्ये ठेवावे याचेही काही नियम आहेत. पीठ जास्त काळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ते शरिरासाठी अपायकारक ठरु शकते. पीठ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्यास ते काळे पडते. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. मळलेले पीठ फ्रीजमध्ये कधीही उघडे ठेवू नका अन्यथा ते खराब होईल. कणकेचा भिजवलेला गोळा हवाबंद डब्यातच ठेवा त्यामुळं कणिक काळी पडत नाही. काळ्या पडलेल्या पीठाच्या चपात्या शरीरासाठी अपायकारक असतात. 

पीठ फ्रीजमध्ये ठेवताना त्यावर तेलाचा किंवा तुपाचा पातळ थर लावा. यामुळं पीठ जास्त काळ मऊ राहिल. तसंत, दुसऱ्या दिवशी चपात्या करताना त्या मऊ होतील. मळलेले पीठ जास्तीत जास्त 48 तासांपर्यंत वापरा. त्यापुढे जाऊन ते पीठ खराब होते. शिवाय चपात्याही चवीला चांगल्या लागत नाहीत. किंवा त्यानंतर पीठ वापरल्यास पोटाच्या समस्या उद्भवू शकतात

दीर्घकाळ फ्रीजमध्ये पीठ ठेवल्यास ती आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून जास्तदिवस पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका. रात्री भिजवून ठेवलेल्या पीठाच्या सकाळीच चपात्या करुन घ्या. पुन्हा रात्रीसाठी तेच कणीक वापरण्याच्या फंदात पडू नका. कारण त्यामुळं आरोग्याचे नुकसान होऊ शकते. कारण जास्त दिवस शिळे असलेले अन्न खाऊ नये.  वारंवार शिळे अन्न खाल्ल्याने शरीराला अपाय होऊ शकतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)