Best Sleeping Position: रात्री झोपण्याची सर्वात चांगली आणि सर्वात चुकीची पद्धत कोणती?

तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी तुमची झोप पूर्ण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर, तुमची झोप नीट होत नसेल तर तुम्हाला अनेक व्याधी सतावू शकतात. 

Updated: Sep 6, 2022, 06:13 PM IST
Best Sleeping Position: रात्री झोपण्याची सर्वात चांगली आणि सर्वात चुकीची पद्धत कोणती? title=

Sleeping habit and good health: तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी तुमची झोप पूर्ण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर, तुमची झोप नीट होत नसेल तर तुम्हाला अनेक व्याधी सतावू शकतात. याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवरही होऊ शकतो. अशात तुम्हाला छान झोप येण्यासाठी तुमची झोपण्याची पद्धतही अत्यंत महत्त्वाची ठरते. दरम्यान, या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला तुमची झोपायची पद्धत योग्य आहे की नाही, झोपायची सर्वात चांगली पद्धत कोणती, सर्वात चुकीची पद्धत कोणती, गरोदर महिलांनी कशा प्रकारे झोपलं पाहिजे? याबाबत जाणून घेणार आहोत.  सर्वात आधी जाणून घेऊयात गरोदर महिलांनी कशा प्रकारे झोपलं पाहिजे.

स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गरोदरपणात एका कुशीवर झोपणं चांगलं मानलं जातं. गरोदरपणात महिलांनी पोटावर झोपणं अत्यंत चुकीची पद्धत असल्याचंही डॉक्टर सांगतात. गरोदरपणात डाव्या कुशीवर झोपल्याने प्लॅसेंटा आणि बाळापर्यंत पोहोचणाऱ्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते. यासोबतच हा बॅकपेनवर देखील चांगला उपाय आहे.  प्रेग्नन्सीमध्ये पाठीवर झोपल्याने तुम्हाला चक्करही येऊ शकते. सोबतच श्वसनाचा त्रास आणि ब्लड प्रेशर संबंधित समस्या देखील सतावू शकतात. 

झोपायची सर्वात चांगली पद्धत कोणती?

तज्ज्ञांच्या मते झोपायची सर्वात चांगली पद्धत (Correct Sleeping Position)  तीच असते ज्यामध्ये तुमच्या पाठीचा कणा, डोकं आणि कंबर सरळ राहते. रात्री झोपताना यांवर ताण येणं आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. अशात एका कुशीवर झोपणं सर्वात चांगलं मानलं जातं. 

एका कुशीवर झोपणं - 

एका कुशीवर झोपणं अत्यंत चांगलं मानलं जातं. यामुळे तुमचा पाठीचा कणा सरळ राहतो. याने तुमची मान, पाठ आणि खांदा सरळ राहतो आणि यासंबंधित त्रासापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकतात. 

पाठीवर झोपणं - 

पाठीवर झोपणं ही झोपण्याची सर्वात कॉमन पद्धत आहे. तुम्ही पाठीवर झोपलात की तुमचा पाठीचा कणा सरळ राहतो. असं झोपल्याने तुम्हाला तुम्हाला मान पाठ आणि खाद्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. जर तुम्हाला ऍसिड रिफ्लेक्स चा त्रास असले तर तुम्हाला ही पोझिशन अत्यंत फायदेशीर ठरू शकते. 

झोपायची सर्वात चुकीची पद्धत - 

जाणकारांच्या मते पोटावर किंवा छातीवर झोपणं ही अत्यंत खराब आणि चुकीची पद्धत आहे (Sleeping on Stomach and Chest). अशा प्रकारे झोपण्याने तुमच्या फुफुसांवर आणि छातीवर प्रेशर येऊन तुम्हाला श्वसनाचा त्रास सतावू शकतो. पोटावर झोपताना तुम्ही उशी घेत असाल तर तुमच्या पाठीला आराम मिळतो. मात्र या स्थतीत झोपल्याने तुमच्या मानेवर आणि छातीवर ताण येतो. यामुळे तुम्हाला झोपेत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. पोटावर किंवा छातीवर झोपण्याचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे, तुमच्या शरीरातील रक्तपुरवठ्यावर होणारा परिणाम.तुमच्या रक्ताभिसरणावर परिणाम झाल्याने झोपून उठल्यावर तुम्हाला हात पाय सुन्न झाल्यासारखं वाटू शकतं. 

know about best and worst sleeping position what is best sleeping position for pregnant women