मुंबई : बेली फॅट वाढल्यानंतर बहुतांश जण सकाळी उठून व्यायाम करत असतील. अनेकदा सकाळी उठून कंटाळा आला असतानाही व्यायाम करावाच लागतो. मात्र आज आम्ही तुम्हाला जास्त मेहनत न घेता belly fat कसं कमी करता येईल याबद्दल सांगणार आहोत. मुळात यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. तुम्हाला केवळ तुमच्या सकाळच्या काही सवयींमध्ये बदल करावा लागणार आहे.
नॉर्थम्ब्रिया यूनिवर्सिटी, न्यूकॅसल यांनी केलेल्या संधोधनानुसार, सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने लोक शरीरातील 20 टक्के अधिक फॅट बर्न करू शकता. रिकाम्या पोटी शरीरातील चरबी बर्न होऊन ऊर्जा निर्माण होते. यामुळे लठ्ठपणा लवकर कमी होण्यास मदत होते.
या काही मॉर्निंग रिचुअल्समुळे कमी होईल फॅट
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर तुम्ही जे दिवसभर खाता त्याचा परिणाम म्हणजे वजनात वाढ होते. असं होतं कारण अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील लेप्टीनचा स्तर कमी होतो.
हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे की, दिवसाच्या योग्य वेळी सूर्यप्रकाश मिळाल्याने सर्कैडियन फ्लो नियंत्रणात राहतो. परिणामी, तुमची उर्जा संतुलित राहते आणि भूक हार्मोन्स नियंत्रणाबाहेर जातात आणि तुम्हाला अनेकदा भूक लागत नाही. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते.
अनेक आरोग्य तज्ज्ञ सकाळी दोन ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. याचं कारण म्हणजे यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी पाणी प्यायल्याने बायोलॉजिकल क्लॉक नियमित होण्यासाठी मदत होते.