मुंबईची हवा 'विषारी'; रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे 10 पदार्थ ठरतील सुपरफुड

Food For Air Pollution: शहरांतील धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या वायुप्रदुषणामुळे सरकारकडून खबरदारीचा सल्ला देण्यात आला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 6, 2023, 03:45 PM IST
मुंबईची हवा 'विषारी'; रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे 10 पदार्थ ठरतील सुपरफुड title=
mumbai air pollution these 10 foods will make your lungs strong and help air pollution

Air Pollution Mumbai: मुंबईसह राज्यातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. पृथ्वीवरील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबईचाही समावेश करण्यात आला आहे. तसंच, वायू प्रदूषण वाढल्याने राज्याच्या आरोग्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात मुंबई आणि लगतच्या परिसरात मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉक टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या प्रदूषणामुळं आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. 

प्रदूषण वाढल्याने मुंबईच्या हवेवर वाइट परिणाम झाला आहे. त्यामुळं अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. प्रदूषित हवेचा परिणामामुळं रोगप्रतिकार शक्तीही कमी होते. अशावेळी ही 10 फळे रोज खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहिलं आणि तुमचा सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होईल. 

टॉमेटोः टॉमेटोमध्ये लाइकोपिन नावाचे अँटिऑक्सिडेंट असते. लायकोपिन आपल्या श्वसनासंबंधीत काम करते आणि हवेत असलेले धुलीकणांपासून श्वसननलिकेला बचावतात. 

आवळाः अनेक अभ्यासात असे समोर आले आहे  की, आवळा खाल्ल्याने प्रदूषकांचा लिव्हरवर परिणाम होत नाही. हवेत असलेले धुलीकण लिव्हरला नुकसान पोहोचवत नाहीत.

हळदः हळद हे उत्तम अँटीऑक्सिटेंड आहे. जे फुफ्फुसांना हवेतील विषारी धुळीच्या कणांपासून संरक्षण करते. हे यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि ते निरोगी बनवते. हळद, गूळ आणि तूप यांचे मिश्रण दम्यासाठी खूप गुणकारी मानले जाते.

तुळसः तुळशीमुळे फुफ्फुसांचे वायू प्रदूषणाच्या वाईट परिणामांपासून संरक्षण होते. याशिवाय तुळशीचे रोप हवेतील धुळीचे कण शोषून हवा शुद्ध करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज 10-15 मिली तुळशीचा रस प्यायल्याने श्वसनसंस्थेतील प्रदूषित कण निघून जातात.

आंबट फळेः मोसंबी, पेरू, किवी, ग्रेपफ्रूट, लिंबू यासारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. या फळांच्या नियमित सेवनाने प्रदूषणाचे वाईट परिणाम दूर होतात आणि फुफ्फुसे मजबूत होतात.

गुळः आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दमा आणि ब्राँकायटिस यांसारख्या अनेक श्वसनाच्या समस्यांवर गुळाचे सेवन खूप प्रभावी आहे. तीळासोबत गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते.

ग्रीन टीः अँटीऑक्सिडेंट्सयुक्त असलेला ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील सारी घाण बाहेर निघून जाते. प्रदूषणाचे परिणाम कमी करण्यासाठी दिवसातून दोन कप ग्रीन टीचे सेवन करा.

अक्रोडः अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. त्यामुळं रोज आक्रोडाचे सेवन केल्यास अस्थमासारखे आजार दूर पळतात. रोज आक्रोड खाल्ल्याने श्वसनासंबंधीत सर्व आजार दूर पळतात. 

बीटः बीटात अनेक नाइट्रेट कंपाउंड्स असतात ज्यामुळं फुफ्फुसाचे कार्य नियमित होण्यास मदत होते. डॉक्टरांच्या मते, नायट्रेट रक्त वाहिन्यांसाठी फायदेशीर असते. ब्लड प्रेशर कमी होते आणि शरीरात ऑक्सिजनची पर्याप्त मात्रा तयार होते. बीटमध्ये मॅग्नीशीयम, पॉटेशियम आणि व्हिटॅमिन सी असते जे फुफ्फुसांसाठी गरजेचे असते. 

लसूणः लसूण खाल्ल्याने शरीरात इन्फेक्शन आणि जळजळ थांबवते. कारण त्यात एलीसिन आढळते ज्यामुळं अस्थमा आणि ब्रोंकाइटिस सारख्या श्वसनाचे विकार दूर पळतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)